लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी आयोजित पत्रकार सन्मान सोहळा

28

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.12जानेवारी):-दर्पण दिनाचे औचित्य साधून लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी तर्फे पत्रकार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी तब्बल 50 पेक्षा जास्त पत्रकाराचा यथोचित सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रा. दिनानाथ फुलवाडकर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख संभाजी वाडेवाले , लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी चे कॅबिनेट ऑफिसर अतुल दादा गंजेवार, केशव देशमुख, कोषाध्यक्ष संजय सुपेकर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडुशेठ सोमाणी तसेच लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी चे संचालक प्रा. मारोती साळवे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी चे अध्यक्ष गोविंद रोडे प्रास्ताविक सहकोषाध्यक्ष गोपाळ मंत्री आभार प्रदर्शन सचिव भगत सुरवसे यानी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बंडु बॉस घुले, महेंद्र वरवडे, अभिजित चौधरी, महेंद्र कांबळे, क्रष्णा पतंगे, निखिल गुंडाळे, अभिजीत सुरवसे यानी परिश्रम घेतले.