सतखेडा येथील ITI जळगांव च्या NSS शिबिराचा समारोप…

31

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगाव(दि.13जानेवारी):- तालुक्यातील सतखेडा दिनांक ०४/०१/२०२३ ते ११/०१/२०२३ दरम्यान आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शासकीय आय टी आय जळगाव यांच्या अंतर्गत ‘विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर’ यशस्वीपणे संपन्न झाले.नितीनकुमार देवरे साहेब तहसिलदार धरणगाव हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर प्रमुख अतिथी म्हणून एम.के पाटील साहेब उपसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नाशिक यांच्यासह सतखेडा सरपंच शरद पाटील, सदस्य उपसरपंच आर.जी.पाटील, ग्रामसेवक एस.पी. खांदे, दत्तात्रय पाटील होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिप प्रज्वलन तसेच सरस्वती देवी, राजमाता जिजाऊ आणि विवेकानंदाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेचा झेंडा फडकविण्यात आला.

सात दिवसीय NSS कॅम्पमधे सतखेडा गावात सकाळी ०६ ते ०७ योगसाधना, ०७ ते ०८ नाश्ता, ०८ ते १२ श्रमदान मोहीम राबविण्यात आली. पहिल्या दिवशी ग्रामस्वच्छता करण्यात आली. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी १२ फूट उंची, २६ फूट लांबी व १५ फूट रुंदीचा भव्य असा बंधारा बांधण्यात आला. चौथ्या पाचव्या व सहाव्या दिवशी कोणतेही शुल्क न घेता जि.प.शाळा, वाचनालय, अंगणवाडी, स्मशानभूमीची, गावातील ३ मंदिरांचे, सोसायटीचे आणि झाडांचे कलर काम करण्यात आले. तसेच २१ ग्रामस्थांच्या घरातील वेल्डिंगचे काम करण्यात आले. वेल्डिंगचे काम दिपक कोळी यांत्रिक मोटार गाडी ट्रेडच्या सरांनी व स्वयंसेवकांनी केले. २७ ग्रामस्थांच्या घरातील वायरींग आणि इलेक्ट्रिक फिटींगचे काम बेलदार सरांनी व स्वयंसेवकांनी केले. ०२ डिश टि.व्ही. रिपेअर करण्यात आले.

नळ दुरुस्तीची कामे करण्यात आले. ०२ AC रिपेअर करण्याचे काम कलाल सरांनी व स्वयंसेवकांनी केले. शोषखड्डे, स्मशानभूमीचे डागडुगीकरण व कलरचे काम दिपक कोळी सर व स्वयंसेवकांनी केले. त्याचप्रमाणे पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्यात आले. रोज दुपारच्या बौद्धिक सत्रात व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते. NSS स्वयंसेवकांचे रोज रात्री सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. ०५/०१/२०२३ रोजी विनोद ढगे यांचे व्यसन मुक्ती व हगणदारी मुक्तीवर पथनाट्य सादरीकरण संपन्न झाले. ०८/०१/२०२३ रोजी नारायण महाराज शिंदखेडा यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. दि.०९/०१/२०२३ रोजी दुपारच्या बोध्दिक सत्रात लक्ष्मणराव पाटील यांनी शिवाजी महाराजांची स्वराज्य निर्मीतीची संकल्पना या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान दिले.

त्याच दिवशी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ७९ ग्रामस्थांनी व ६० स्वयंसेवकांनी डोळे तपासणी करून घेतले. शिबिरात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या उत्कृष्ट स्वयंसेवकांची निवड करण्यात आली. हसिराम बारेला , निहार सुर्वे, भाग्यश्री वाघुळदे, अक्षदा सावंत या उत्कृष्ट स्वयंसेवकांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्मृतीचिन्ह संस्थेतील दिपक कोळी सर (यांत्रिक मोटार गाडी) यांनी बनवीले होते. एका स्मृतीचिन्हाची अंदाजे किंमत ४५० रुपये होती.

राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबिरासाठी प्राचार्य स.मा.पाटील, उपप्राचार्य राजश्री पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. शिबीर यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी
दिपक एस. कोळी, सहाय्यक अधिकारी संदिप उगले, का.अधिक्षक बाळासाहेब कुमावत,‌ एस.आर.बोरोले, एम.एम.पाटील, पठाण सर, येवले सर आदींनी परिश्रम घेतले.