पिंपळदरी येथे राष्ट्रीय गळीतधान्य विकास कार्यक्रम अंतर्गत शेतकरी प्रशिक्षणसंपन्न

29

✒️धनज प्रतिनिधी(अमोल जोगदंडे)

धनज(दि.13जानेवारी):-आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष व राजमाता जिजाउसाहेब , स्वामी विवेकानंद जयंती निमित्त तालुका कृषी अधिकारी कार्यालय उमरखेड व ग्रामपंचायत पिंपळदरी यांच्या सहयोगाने पिंपळदरी येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत गळीतधान्य विकास कार्यक्रम शेतकरी प्रशिक्षण दिनांक 12 जानेवारी रोजी संपन्न झाले. या प्रशिक्षणा साठी अध्यक्ष म्हणून पिंपळदरीचे सरंपच बंडूभाऊ ढाकरे , प्रमुख मार्गदर्शक तालुका कृषी अधिकारी श्री गंगाधर बळवंतकर , प्रमुख पाहुणे धनज येथील माजी सरंपच श्री चरणजी डोंगरे उपस्थित होते .

कार्यक्रम ची सुरुवात राजमाता जिजाऊसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. श्री चरणजी डोंगरे यांनी आदिवासी बहुल गावामध्ये कृषी विभागा मार्फत विविध योजना राबविण्यास प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी केली . तसेच माता जिजाऊ साहेब प्रमाणे स्त्रियांनी व विवेकानंद प्रमाणे होतकरू तरुणांनी स्वतः कृषी आधारीत उदयोग निर्माण करावेत असे सांगितले.

तालुका कृषी अधिकारी श्री गंगाधर बळवंतकर यांनी रब्बी हंगामातील गळीतधान्य पिकाचे महत्व , रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड , मुख्यमत्री सुक्ष्म सिंचन योजना अंतर्गत शेततळे , महाडीबीटी वरील कृषी यांत्रिकीकरण , फलोत्पादन अभियानांतर्गत सविस्तर मार्गदर्शन करून त्या मध्ये शेतकर्यांनी सहभाग घेऊन आपल्या आधुनिक तंत्रज्ञान मध्ये उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्त्रियांनी व होतकरू तरुणांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी पुढे येऊन कृषी आधारीत लहान उद्योग उभारणी करावी असे सांगितलें . कृषी सहायक सोमनाथ जाधव यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रकिया उद्योग उभारणी करण्यासाठी पात्रता निकष, उद्योग कसा उभारावा , ग्रामीण भागात गावामधे कृषी आधारित उद्योगाची सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले .

यावेळी उपस्थित सौ मनिषाताई कन्हाळे यांनी माता जिजाऊ प्रमाणे महिलांनी उदयोग उभारणी साठी पुढे येऊन उद्योजक व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली . कार्यक्रमांचे अध्यक्ष सरंपच बंडुभाऊ ढाकरे यांनी तृणधान्य वर्ष निमित्त शेतकरयांनी कृषी योजनांचा लाभ घेऊन स्वंयपूर्ण व आधुनिक शेती करावी असे सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सामाजिक चळवळीचे काम करणारे श्री संदेश कांबळे यांनी केले. या कार्यक्रमास कृषी पर्यवेक्षक आर. एन. शिंदे , पिंपळदरी तंटामुक्ती अध्यक्ष , माजी सरंपच सुरेश तांभारे , विजय हनवंते , ग्रामपंचायत सदस्य , सोसायटीचे अध्यक्ष तसेच गावातील शेतकरी , तरुण वर्ग , विशेषतः महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते