नागभिड तालुक्यातील पहिली सी.एस.- अभिलाषा राजन जयस्वाल

30

✒️संजय बागडे(विशेष प्रतिनिधी)

नागभीड(दि.13जानेवारी):- नागभीड येथील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजन जयस्वाल सर यांची मुलगी कुमारी अभिलाषा हिने कुटुंबातील वडिलांचा शिक्षणोपार्जित वारसा जोपासत तालुक्यातील पहिली सी. एस. होण्याचा बहुमान पटकावलेला आहे.

अभिलाषा ही हुशार असून तिने नागपूर येथून बी.बी.ए. एल.एल.बी. पूर्ण करीत पुण्यातील द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया या संस्थेतून सी.एस, एल.एल.एम. ही पदवी नुकत्याच झालेल्या मुंबई येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातून अशा असे यश संपादन करणारी अभिलाषा पुढे कंपनी सेक्रेटरी होत आंतरराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर कार्य करून इतरांनाही मार्गदर्शन करीत पर्यवेक्षीय यंत्रणा सांभाळत फार मोठे नावलौकिक मिळवणार हे स्वप्न पूर्णत्वास आले आहे.

आंतरराष्ट्रीय बहुमूल्य उद्योग, व्यवसायात मानाचे स्थान मिळवित, आपल्या ज्ञानाचा फायदा परिसरातील बांधवांना विद्यार्थ्यांना करून देण्यास प्रयत्नरत राहण्याचे ती आवर्जून सांगते आहे. तिच्या दैदिप्यमान यशस्वीते बाबत तथा दुर्मिळ अभ्यासक्रमातील आवडीनिवडी बाबत, तिच्या शैक्षणिक भरारीला यशस्वीत्व लाभले आहे.प्रसंगी आई-वडील, भाऊ, कुटुंबीय, आप्तेष्ट, संस्था पदाधिकारी तथा नागभीडकर यांचे कडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.