स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ,विवेकानंद जयंतीनिमित्त समता विद्यालयात विद्यार्थ्यांचे अनोखे अभिवादन : कॉ.गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता पुस्तकाचे क्रमशः वाचन सुरू

47

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.13जानेवारी):-बुद्ध काळातील संघ राज्यव्यस्था छत्रपती शिवरायांनी आपल्या राजकारभारात अवलंबली,धर्मनिरपेक्ष,वैज्ञानिक दृष्टिकोन,मानवतावादी मूल्य विचार,कुणबी (शेतकरी) हित, उपेक्षित घटकास न्याय हे सूत्र संस्कार त्यांना राजमाता जिजाऊ यांनीच केले. स्वराज्य ते सुराज्य हा जगाला थक्क करणारा कारभार माता जिजाऊंच्या विचार प्रेरणेनेच शिवरायांनी चालवला असे मत येथील समता प्रतिष्ठान येवला संचलित समता माध्यमिक विद्यालय,सुरेगांव (रस्ता) येथे आयोजित राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यरांनी व्यक्त केले.

स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ,विवेकानंद जयंतीनिमित्त समता विद्यालयात विद्यार्थ्यांनी कॉ.गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता’ ह्या पुस्तकाचे क्रमशःवाचन सुरू करून अनोखे अभिवादन केले असून सदर पुस्तकातील रोज एक मुद्दा (टॉपिक) परिपाठाच्या वेळी केले जाणार असल्याची माहिती मुख्याध्यापक जी.एल.जाधव सर यांनी दिली आहे.रयतेचाराजा,कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज कार्य आणि कर्तृत्व जाणीवपूर्वक दृष्टी,सृष्टीआड करण्याचं षडयंत्र अनेक शतकांपासून झालं असून महात्मा ज्योतिबा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढत त्यांच्या जीवनकार्यावर दीर्घ पोवाडा लिहिला.

स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना राष्ट्रप्रेम, राष्ट्र निष्ठा व वैज्ञानिक दृष्टिकोन दिला असल्याचे ह्या वेळी सांगण्यात आले.काजल गायके, वैष्णवी जाधव,कीर्ती जाधव,साक्षी तुपे,अनुष्का चव्हाण,समृद्धी गोसावी,प्रगती गायके,साक्षी शिर्के यांनी माँ जिजाऊ यांच्या जीवन कार्यावर समयोचित भाषणे केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षक हरिभाऊ सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून सोपान भागवत हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी.बी.मगरसर व सूत्रसंचालन विनोद सोनवणेसर यांनी केले. आर.एम.मढवईसर,एस.डी.शेजवळसर,बी.एम.गोविंदसर,एल.डी.दाणे (मामा)शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी ह्यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.