अमळनेर येथे स्वाश्रयी महिला सेवा संघ तर्फे जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

29

✒️अमळनेर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमळनेर(दि.12 जानेवारी):- रोजी स्वाश्रयी महिला सेवा संघ अमळनेर अंतर्गत प्रायमार्क शाश्वत कापुस प्रकल्प अमलनेर तालुक्यातील 51 गावामध्ये सुरू आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त स्वाश्रयी महिला सेवा संघ अमळनेरच्या कार्यालयामध्ये राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रम श्रीमती भानुमती मकवाणा (वरिष्ठ राज्य समन्वयक) व श्री पंकज देशमुख (राज्य समन्वयक) यांच्या मार्गदर्शन खाली घेण्यात आला.

या कार्यक्रमात राजमाता जिजाऊ यांचे जीवन चरित्रावर आधारित 51 पुस्तक महिला कृषी सखी यांना भेट म्हणून देण्यात आले. प्रकल्प समन्वयक अश्विनी माळी यांनी आपल्या मनोगतातून जिजाऊ यांच्या जीवनातील संघर्ष आपल्या डोळ्यासमोर ठेऊन आपण ही प्रतिकूल परिस्थतीत संघर्ष करून स्वतः ची क्षमता ओळखून स्वतःला सिद्ध केलं पाहिजे.तसेच कृषी सखी ज्योती विंचूरकर,वैशाली चौधरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमात मोठया संख्येने महिला कृषी सखी उपस्थित होत्या ,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विवेक वानखडे ( प्रकल्प समन्वयक),अश्विनी माळी(प्रकल्प समन्वयक) पंकज गुंडप्पा, गोविंदा ढोबळे,रवींद्र गाढे,(कृषी सल्लागार) प्रताप जाधव,खुशी साळी, उज्वला पाटील,कोमल कदम यांनी परिश्रम घेतले.