राष्टीय बंजारारत्न पुरस्कार आबादास राठोड सन्मानित यांचा व्हॉलीबॉल ग्रुप केला सन्मान

31

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.15जानेवारी):-धर्मगुरू महान तपस्वी संत डॉ. रामराव महाराज बंजारा समाज विकास फेडरेशन भारत तर्फे राष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्कार आंबादास राठोड यांना महंत शेखर बापू पोहरादेवी यांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

आबादास राठोड यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्या मार्फत आरोग्य शिबीर रक्तदान शिबिर व विविध माध्यमातून गोरगरिबांना मदत कशी करता येईल तशी मदत केली व
आज १०वर्षांपासून अहोरात्र जन सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून निरंतर काम करणारा परभणी जिल्ह्यातून गंगाखेड तालुक्यातील शिवाजीनगर [तांडा] या गावातील निस्वार्थ पणे गोरगरिबांच्या हक्कासाठी लढणारा एकमेव सामाजिक कार्यकर्ता आबादास शिवाजी राठोड यांच्या कार्याची दखल घेऊन बंजारा तिर्थकाशी पोहरादेवी येथे राष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.