राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पदावर राकेश दंडीकवार

20

✒️चामोर्शी (पुरोगामी संदेश नेटवर्क)

🔹राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चामोर्शी तालुका उपाध्यक्ष पदावर राकेश दंडीकवार यांची नियुक्ती तालुका अध्यक्ष नेमाजी घोगरे यांनी केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री तथा आमदार राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात्मक सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागात पक्ष वाढीसाठी दंडीकवार यांनी कार्य करावे,अशी अपेक्षा नियुक्ती पत्रात केली आहे.
या नियुक्ती बद्दल दंडीकवार यांचे सर्वत्र त्यांच्या चाहत्यांनी अभिनंदन केले आहे.