काकडदाती येथे रमाई जयंती उत्सवात साजरी

32

🔸सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
___________________________
पुसद(दि.8फेब्रुवारी):;तालुक्यातील काकडदाती ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या रमाई नगर येथे रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आदरणीय संघपाल आडोळे सर तर प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त यशवंत देशमुख हे उपस्थित होते. सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक त्रिशरण पंचशीला ग्रहण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय यशवंतराव देशमुख यांनी रमाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकत लहान मुलांवर महिलांनी कसे संस्कार करावे, महिलांचे आचरण कसे असावे, घरातील पुरुषांना सामाजिक कार्य करीत असतांना महिलांचा किती मोठा वाटा असतो याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात आडोळे सर यांनी रमाई यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले.

त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये रमाई नगर मधील लहान लहान मुलांनी रमाई यांच्या जीवनावर भाषणे, गीते सादर करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यावर नृत्य सादरीकरण केले. यावेळी कार्यक्रमांमध्ये भाग घेणाऱ्या सर्व मुलांना धीरज कांबळे यांच्याकडून बक्षिसे देण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत पाईकराव यांनी तर आभार प्रदर्शन प्रकाश खंडागळे यांनी केले यावेळी रमाई नगर येथील संघभूमी बौद्ध विहाराचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य व समस्त नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.