बेकायदेशीर कर्ज वसुलीस पोलीस संरक्षण देऊ नये..शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

31

✒️सचिन सरतापे(म्हसवड प्रतिनिधी)

म्हसवड(दि.8फेब्रुवारी):- सहकारी बँक पतसंस्था कर्ज वसुली बाबत सहकार कायद्याचे कलम 101दाखल्याच्या आधारे एकत्र कुटुंब मिळकतीवर जप्ती बोजा नोंदी करू नये,शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य गरीब कर्जदारांच्या राहत्या घराचा आगर शेतीचा कोणत्याही पतसंस्थेच्या सांगणे वरून अगर पत्रावरून मिळकतीचा ताबा देण्यात येऊ नये.अशा बेकायदेशीर कर्ज वसुलीस पोलीस संरक्षण देऊ नये.अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी निवेदना द्वारे करण्यात आली.

शेतकरी संघटने निवेदनात अशी ही मागणी केली आहे कि,दिवाणी न्यायालयाच्या स्पष्ट आदेशाशिवाय एकत्र कुटुंब मिळकती जप्त करू नये, अगर ताबा देण्यात येऊ नये, हमीपत्र नसताना कोणत्याही सहकारी बँका पतसंस्थांचे थकीत कर्जाच्या वसुली करता शेतकऱ्याच्या उसातून बिल कपात करण्यात येऊ नये.

या बाबतीत शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने सातारा जिल्ह्यातील पतसंस्था व बँकाच्या अन्यायकारक वसुलीबाबत व शेतकऱ्यांच्या वर होत असलेल्या अन्याय बाबत सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री रुचेश जयवंशी साहेब यांच्यासोबत चर्चा केली तसेच नोंदणीकृत सहकारी बँका पतसंस्था व त्यांचे फेडरेशन हे न्यायालय नाही त्यामुळे त्यांचे सांगणे वरून अगर पत्रावरून कोणत्याही स्वरूपात जप्ती बोजा नोंदी करू नयेत अगर ताबा देऊ नये अशा मागणीचे निवेदन शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना दिले यावेळी जिल्हाधिकारी यांनी कोणत्याही स्वरूपात बेकायदेशीर ताबा देण्यात येणार नाही शेतकऱ्यांच्या वर अन्याय होऊ देणार नाही संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केली जाईल एकत्र कुटुंब मिळकती व कर्ज न घेणाऱ्या इसमाचे मिळकतीवर बोजा नोंदी केल्या जाणार नाहीत तसेच बेकायदेशीर ताबा दिला जाणार नाही. तसेच बेकायदेशीर ऊस बिल कपात होणार नाही ,असे आश्वासन शेतकरी शिष्ट मंडळास दिले.

यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बर्गे पाटील, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव, शेतकरी संघटनेचे क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील ,शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक अशोकराव पाटील, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शांताराम बाबर , युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत भोसले, विभाग प्रमुख तात्या पाटील, कोरेगाव तालुकाध्यक्ष धन्यकुमार जाधव, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव खबाले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष श्रीमती रंजनाताई पाटील ,सौ शबाना मुल्ला, महिला आघाडी तालुकाध्यक्ष रोहिता कदम, विभाग प्रमुख प्रवीण भुसारी ,शेतकरी संघटनेचे कराड उत्तर अध्यक्ष वशिम इनामदार, कराड दक्षिणाचे अध्यक्ष संजय थोरात, युवक तालुकाध्यक्ष प्रशांत कदम , कोपर्डे गावचे माजी सरपंच वसंतराव चव्हाण नाना ,सामाजिक कार्यकर्ते अशोकराव चव्हाण, सदाशिव कार्वेकर ,पमाबाई तागड ,प्रवीण उतळे , शांताराम बाबर आदी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.