सम्यक बुध्द विहारात माता रमाई जयंती साजरी

103

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.9 फेब्रुवारी):-“नव कोटी लेकरांची माय पाहीली”…! “रमाई दुधावरची साय पाहिली”…!! असे अनेक भीम बुद्ध व रमाई गीत गाऊन माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील सम्यक बुद्ध विहारामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि नऊ कोटीची दलितांची मायमाऊली माता रमाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहून सुरूवात केली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिराबाई दिवेकर (माजी नगरसेविका) हे होत्या.

व यांनी अध्यक्षीय भाषणात मध्ये रमाई बद्दल आपले विचार मांडले.व तसेच शांताबाई दिवेकर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.

युवा पत्रकार सिध्दार्थ दिवेकर यांनी “नव कोटी लेकरांची माय पाहीली”…!”रमाई दुधावरची साय पाहिली”…!! असे अनेक भीम बुद्ध व रमाई गीत गाऊन माता रमाईस आदरांजली अर्पण केली.

यावेळी हिराबाई दिवेकर, सिध्दार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भीम टायगर सेना उमरखेड), जिजाबाई दिवेकर, सुभद्राबाई पाईकराव, धुरपताबाई दवणे, उषाताई इंगोले, शांताबाई दिवेकर, यशोधरा धबाले, बेबाबाई गवंदे, यशोदाबाई दिवेकर, कु. माधवी केंद्रेकर, बुद्धभूषण इंगोले, अंकुश दिवेकर इत्यादी अनेक बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.