महावीरनगर येथील पारमिता बुध्दविहारात त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर जयंती साजरी

31

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.10फेब्रुवारी):- पारमिता बुद्धविहार महाविरनगर पुसद येथे मातोश्री रमाई आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.पुसद शहरालगत असलेल्या उमरखेड रोडवरील महावीर नगरच्या पारमिता बुद्ध विहार येथील विशाल सभागृहामध्ये नव कोटी दीन दलितांच्या माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वप्रथम पारमिता बुद्ध विहार येथील विशाल बुद्धमूर्ती समोर अभिवादन करून परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून माता रमाई यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त उपस्थित, प्रज्ञापर्व समिती 2022 चे पदाधिकारी,समता सैनिक दल, पारमिता महिला मंडळ ,बौद्ध बांधव, महिला भगिनी या सर्वांच्या वतीने त्रिवार अभिवादन करून सामूहिक त्रिशरण, पंचशील, घेण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथीनी माता रमाई यांच्या संघर्षमय त्यागी जीवन चरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये प्रा.कल्याण साखरकर,पत्रकार राजेश ढोले,समता सैनिक दलाचे दीपक भवरे तसेच प्रज्ञापर्व समिती 2022 चे अध्यक्ष विठ्ठल खडसे
इत्यादींनी माता रमाई चा खडतर जीवनपट मांडण्याचा प्रयत्न केला.उपस्थित सर्व मान्यवरांना समता सैनिक दलाच्या वतीने,स्वागत करून आपल्या धम्म बांधवास जयंती दिनी मानवंदना देण्यात आली.

*”समता सैनिक दलाचे उत्कृष्ट कार्य बघून हे कार्य् अधिक* *जोमाने करावे आपणास कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मदतीसाठी मी तयार असल्याचे प्रतिपादन रमाई पुरस्कार प्राप्त उद्योजक, विठ्ठल खडसे यांनी केले”

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष भारत कांबळे यांनी तर सूत्रसंचालन भा. बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष ल.पू. कांबळे यांनी केले,तर आभार खडसे यांनी केले या कार्यक्रमाला,प्रमुख उपस्थिती म्हणून,प्रज्ञापर्व समिती2022 चे अध्यक्ष,विठ्ठल खडसे,उपाध्यक्ष राजेश ढोले,अशोक भालेराव,सचिव दीपक भवरे,प्रा. कल्याण साखरकर,मंडळ अधिकारी दिवे, संघटक संतोष आंबोरे, समता सैनिक दलाचे सैनिक तसेच पारमिता महिला मंडळाच्या कार्यकर्त्या बाल बालिका, बौद्ध बांधव इत्यादी बहुसंख्येने उपस्थित होते.