भारतीय बौध्द महासभेचे वतीने चिमुरात गीत गायन स्पर्धा संपन्न

33

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)

चिमूर(दि.12फेब्रुवारी):-भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा चिमूर व महिला मंडळ चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने रमाई जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चिमूर येथे गीत गायन स्पर्धा संपन्न झाली.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा चिमूरचे अध्यक्ष लहूजी पाटील हे होते. प्रमुख अतिथी म्हणून शहर अध्यक्ष नंदकिशोर अंबादे, जनार्धन खोब्रागडे, शिवराम मेश्राम, पुष्पा राऊत, गुलाब गणवीर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी भारतीय बौध्द महासभा हे विविध कार्यक्रमाचे आयोजन करून सामाजीक जाणीव जागृती निर्माण करण्याचे कार्य करते. जीवन जगण्याचे ध्येय प्रसाराच्या माध्यमाने जनतेसमोर मांडत असते असे मत व्यक्त केले.

ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. पुरुष गटामध्ये २२ तर महिला गटात १६ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यात बुद्ध, फुले, आंबेडकर, रमाई, तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांचे कार्यावरील गीतांचा सहभाग होता. या स्पर्धेत पुरुष गटामध्ये अमर अंबादे चिमूर प्रथम, प्रकाश मेश्राम खापरी द्वितीय, भूषण सिडाम वडाळा (पैकु) तृतीय तसेच महिला गटामध्ये प्रतिमा लोखंडे उरकुडपार प्रथम, साहिली पेटकर वडाळा (पैकु) द्वितीय, आचल बारसागडे किटाळी तृतीय तसेच प्रोत्साहनपर दोन्ही गटाला बक्षिसे देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त नारायण कांबळे गुरुजी, संचालन प्रकाश मेश्राम यांनी केले. उपस्थितांचे आभार एन. पी. रामटेके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पितांबर खोब्रागडे, रामचंद्र गेडाम, वासुदेव गायकवाड, श्रीदास राऊत, सिद्धार्थ शंभरकर, शालिक थूल, मधुकर राऊत यांनी अथक परिश्रम घेतले.