सहा आंदोलनकर्त्यांची प्रकृती बिघडली दोन रुग्णालयात दाखल

40

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

पोफाळी(दि.12 फेब्रुवारी):-येथील वसंत सहकारी कारखान्याच्या प्रशासकीय कार्यालयासमोर वसंत कामगार संघटनेच्या कामगारांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसलेल्या कामगारांपैकी सहा आंदोलनकर्त्याची प्रकृती बिघडली असून यातील दोन आंदोलन कर्त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यामुळे कामगारात रोष वाढला आहे.

आंदोलनाचा तिसरा दिवस पूर्ण होऊनही अवसायक यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्यामुळे कामगारांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

2 फेब्रुवारी कामावर घेण्यासंदर्भात वसंत कामगार युनियनच्या कामगारांनी कामावर घेण्यासंदर्भात अवसायक यांना निवेदन सादर केले होते.

5 फेब्रुवारीला अवसायक, भैरवनाथ शुगर वर्क्स व कामगारांमध्ये चर्चा झाली त्यानंतर दुसरी निर्णायक बैठक आठ फेब्रुवारी घेण्यात येणार होती मात्र अवसायक यांच्या बदली नाट्यामुळे आठ फेब्रुवारीची बैठक होऊ शकली नाही दरम्यान 9 मार्चपासून 16 कामगारांनी असायक यांच्या प्रशासकीय कार्यालयासमोर दुपारी बारा वाजता उपोषणाला सुरुवात केली. शनिवारी उपोषणाचा तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांवर बेमुदत आमरण उपोषणाचा परिणाम दिसून आला 16 आंदोलनकर्त्यांपैकी सहा आंदोलनकर्त्याची प्रकृती बिघडली आहे मळमळ उलट्या व पोट दुखी यासारखा त्रास आंदोलनकर्त्यांमध्ये दिसून आला आहे.

यातील ज्ञानेश्वर सूर्यवंशी व चद्रशेखर धुमाळे या दोन आंदोलकर्त्याना मुळावा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

[सर्व आंदोलकर्त्यांची तपासणी करण्यात आली असून दोन आंदोलन कर्त्यांची जास्त प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुळावा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.- डॉ. उद्धव हिंगमिरे] (समुदाय आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र मुळावा).