लाइट्स मेटल एण्ड एनर्जी लिमिटेड कंपनीतर्फे उसगांव गावात बस्थानक नुतनीकरण व सौंदर्यीकरण

30

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.17फेब्रुवारी):- येथील काही अंतरावर उसगांव येथे लाइट्स मेटल एण्ड एनर्जी लिमिटेड घुग्घुस यांच्या सी.एस.आर निधी सन २०२२-२३ अंतर्गत उसगांव येथे बस्थानक नुतनीकरण व सौंदर्यीकरण करण्यात आले.लाइट्स मेटल उद्योगाचे सामाजिक दायित्व कार्यतुन करण्यात आले.तसेच सौंदर्यीकरण, विविध झाडे लावण्यात आले.गेल्या महिण्यात घुग्घुस नगरपरिषद समोर बालाजी लाॅन येथे लाइट्स कंपनीने निशुल्क चिकित्स आयोजन करण्यात आले होते,परिसरातील गावा- गावात वृक्षारोपण करण्यात आले होते.

समोर भविष्यात घुग्घुस व परिसरातील गावाचे लाइट्स मेटल एण्ड एनर्जी लिमिटेड कंपनी विविध प्रकाराचे उपक्रम लाभविण्यात येणार आहे, असे मनोगत कंपनीचे प्रमुख हेड संजय कुमार यांनी म्हनटले.यावेळी लाइट्स मेटल उद्योगाचे प्रमुख हेड व उद्धाटक श्री. संजय कुमार,उपाध्यक्ष श्री.पवन मेश्राम, मानव संसाधन व्यवस्थापक श्री.तरुण केशवाणी, आदित्य सिंग, रतन मेडा,उसगांव गावाचे सरपंचा सौ.निविता ठाकरे,उपसंरपंच मंगेश आसुटकर, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.