आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बार्टी मार्फत अभिवादन कार्यक्रम

33

✒️जवळा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

जवळा(दि.18फेब्रुवारी):-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, बार्टी पुणे यांच्यामार्फत जवळा बाजार मध्ये अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य शफी कुरेशी, एडव्होकेट खंडेलवाल साहेब, छत्रपती फाऊंडेशनचे पवन घोंगडे, शंकर खंदारे व शाम शेजवळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बार्टीचे समतादूत सुकेश कांबळे व रहीम कुरेशी यांनी उपस्थिती युवकांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामप्रसाद वाकोडे,
अनिकेत शेजवळे,इशांत शेजवळे,शुभम शेजवळे,राहुल दाभाडे,शिवम शेजवळे, रमेश शेजवळ, मनोज शेजवळ व प्रकाश पोहूळकर यांनी मोलाचे सहकार्य केले.