छत्रपती शिवाजी महाराज यांचा वास्तव इतिहास समजून घेणे गरजेचे-ॲड. प्रकाश मोरे

32

🔹माजी आमदार राजीव आवळे यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.19फेब्रुवारी):-छत्रपती शिवाजी महाराज यांचा ढगधगता, क्रांतिकारी वास्तव इतिहास नव्याने समजून घेतला पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲड. प्रकाश मोरे यांनी केले. ते सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंट, मुक्ता फौंडेशन, कोल्हापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त… त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी “परिचित अपरिचित छत्रपती शिवाजी महाराज” या महत्वपूर्ण व छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट उलघडणाऱ्या विषयावर मांडणी करतांना राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे बोलत होते

यावेळी बोलतांना माजी खासदार डॉ. जोगेंद्र कवाडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज एका जातीचे राजे नव्हते तर ते रयतेचे राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने होत असलेले संकुचित राजकारण थांबले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे जातीअंताचे प्रतिक बनले पाहिजे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, सामाजिक विचारवंत माजी आमदार राजीव आवळे यांना त्यांच्या सामाजिक बांधिलकी मानून करीत असलेल्या गेल्या 30-40 वर्षांच्या कामाची दखल घेऊन मुक्ता फौंडेशन, कोल्हापूर आणि सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंटचा या वर्षीचा नावाजलेला व सन्मानाचा जीवन गौरव पुरस्कार माजी खासदार डॉ. जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते देण्यात आला. त्याच बरोबर यावेळी अन्वी घाटगे, प्राचार्य डॉ. सतीश देसाई, छाया पाटील, शंकर अंदानी, शेख जावेद मंजूरपाशा, मोहन मिणचेकर, प्रा. डॉ. मोहन लोंढे, विजय साठे, रवींद्र श्रावस्ती, शंकर पुजारी, प्रा. प्रसाद दावणे, अपूर्वा पाटील, प्रा. डॉ. मारुती लोंढे, डॉ. विजय चांदणे, रूपाताई वायदंडे, प्रकाश सांडूगडे, काशिनाथ सुलाखेपाटील, डॉ. उत्तम सकट, बाबासाहेब माने, डॉ. सयाजीराव गायकवाड या मान्यवरांनाही राज्यस्तरीय व्यक्तीवेध पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

सदर कार्यक्रमास ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. खंडेराव शिंदे, निर्मिती विचारमंचचे अध्यक्ष अनिल म्हमाने, मुक्ता फौंडेशन, कोल्हापूरचे प्रा. अमोल महापुरे, अब्राह्मबापू आवळे डॉ. नंदकुमार गोंधळी, ॲड. करुणा विमल, स्मिता आवळे यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.