चातारी येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी आणि बक्षिसांची परंपरा

30

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 20 फेब्रुवारी):- उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नौकरी तसेच शिक्षणाचे हक्कापासून वंचित असल्यामुळे बहुजन समाज शिक्षण आणि नौकरीपासून कोसो दूर होता . मोलमजुरी कष्टाची कामे करणे, ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी शेती कसणे आणि पोटाची खळगी भरने हाच एकमेव व्यवसाय होता.

अशापरिस्थितीत एक महापुरुष पुढे आला आणि त्याने इंग्रजी सत्तेला प्राथमिक शिक्षण विशेषतः महिला शिक्षण सक्तीचे करावे म्हणून मागणी केली.इंग्रजांनी पण त्या मागणीचा पुरेपूर विचार केला आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचे झाले . पुढे या महापुरुषाने आपल्या वैयक्तिक स्वबळावर 1848 मध्ये भिडेवाद्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली तो महापुरुष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले होय .

त्यांनी महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, त्याकामी त्यांना सावित्रीबाई फुले यांचे अत्यंत मोलाचे योगदान मिळाले.
ग्रामीण शिक्षणाची चळवळ सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कर्मवीर भाऊराव पाटील गाडगे बाबा डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी मोठ्या प्रमाणात राबाविली .त्याचाच आदर्श घेऊन जुन्या पुसद तालुक्यात म्हणजे आत्ताच्या पुसद उमरखेड महागाव तालुक्यात दिवंगत लोकनेते देवराव पाटील चौंढीकर सहकारमहर्षी भाऊसाहेब माने मामासाहेब शिलार गुणवंतराव देशमुख विठ्ठलराव देशमुख सवणेकर या सहकाऱ्यांनी मिळून 1956 साली पुसद येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करून परिसरातील गोरगरिबांच्या लेकरांच्या शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली.

या सत्यशोधकी विचारांच्या महापुरुषांनी ही शिक्षणाची गंगोत्री पुसद पुरतीच मर्यादित न ठेवता टप्प्याटप्प्याने सवणा पोफाळी मुळावा ब्राह्मणगाव बेलोरा जामबाजार भोजला खडका पासून ते चातारी सारख्या अतिदुर्गम खेड्यात पोहोचविली.

चातारी सारख्या पैनगंगा नदी तीरावर वसलेल्या दुर्गम कोणतीही सुखसुविधा नसलेल्या खेड्यात शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे म्हणजे अत्यंत अवघड आणि जिकीरीचे काम होते.

नुसती शाळा सुरू करून पूर्ण होणारे काम नव्हते त्यासोबतच विद्यार्थ्यांची राहण्याची म्हणजे वसतिगृहाची सोय करणे आवश्यक होते.त्यासाठी राहण्याची व भोजनाची व्यवस्था करणे जरुरीचे होते आणि खूप मोठे संघर्षाचे काम होते.

परंतु हे काम भाऊसाहेबांनी मोठ्या ताकतीने चातारी येथील दानशूर मोठ्या मनांच्या लोकांच्या सहकार्याने सुरू केले. चातारी येथील शाळेची स्थापना 1जुलै 1963 साली करण्यात आली. भाऊसाहेबांनी त्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले आणि पुढे स्व. पंजाबराव माने यांनी ती शिक्षणाची गंगोत्री पुढे नेण्याचे काम प्रामाणिकपणे पार पाडले.

आजरोजी चातारीच्या श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात 5 ते 12 वि पर्यतचे कला व व्यावसायिक शिक्षण दिले जाते. चातारी येथील शाळेत शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, आयुक्त, तहसीलदार, डॉकटर, अभियंता, प्राध्यापक, शिक्षक, मोठे व्यावसायिक यासारख्या उच्च पदावर विराजमान झालेले आहेत.

त्यापैकी श्री संभाजी राणे, श्री नरेंद्र कवडे , श्री भास्कर वानखेडे , श्री सुभाष गोविंदवार , श्री रंगरावजी पवार , डॉ सुरेश तुकाराम माने ,
श्री रत्नाकर गोविंदवार , श्री गणेशराव माने , डॉ विश्वासराव माने , श्री गणेशराव गोविंदवार, श्री रवि गोविंदवार , श्री गजानन हामंद , श्री विनायक नागोराव माने , श्री अभियंता दत्तात्रेय दिगंबर हामंद, श्री रमेश पसलवाड , श्री शैलेश दिगंबर पसलवाड सहा. पोलीस आयुक्त मुंबई , श्री विजय वाठोरे , डॉ देवराव देवसरकर, डॉ शंकरराव देवसरकर, डॉ तुकाराम आनंदराव माने डॉ संदीप नरवाडे यासारखी अनेक मंडळी या शाळेत शिक्षण घेऊन मोठ्या पदावर कार्यरत आहेत किंवा सेवांनिवृत्त झाली आहेत आणि सोबतच गुणवंत विद्यार्थी परंपरा आजपर्यंत कायम आहे.

या शाळेचे विद्यार्थी मोठमोठ्या पदावर पोहचण्यासाठी व्यवस्थापक मंडळाचे नियोजन , मुख्याध्यापक शिक्षकांचे कष्ट आणि त्यासोबत गावातील देणगी दात्यांचे प्रोत्साहन अत्यंत मोलाचे ठरले आहे.

गेली चाळीस वर्षांपासून चातारी येथील देणगी दाते विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी त्यांचा उत्साह द्विगुणित व्हावा आणि त्यामाध्यमातून त्यांची प्रगती व्हावी या उदात्त हेतूने गुणवंत विद्यार्थ्यांना आपल्या वाडवडीलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी बक्षीस देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येते. त्यामध्ये मान्यवर दाते मंडळीचा विशेष उल्लेख करून त्यांचेप्रती संस्थेच्या वतीने आदर व्यक्त करणे प्राधान्याने जरुरीचे ठरते.

आजपर्यंत संस्थेच्या विद्यार्थ्यांना प्रगतीसाठी प्रोत्साहित करीत आलेली दाते मंडळी मध्ये परमपूज्य स्व. सखुबाई नागोराव गावंडे , स्व. भास्करराव पाटील कदम , परमपूज्य स्व. नानाराव तुकाराम माने , परमपूज्य स्व शामराव जांबुवंतराव माने
वरील सर्व दात्यांचे स्मृतिप्रीत्यर्थ दिली जाणारी देणगी यजिम बँक शाखा चातारी येथे ठेव ठेऊन वर्षभराच्या येणाऱ्या व्याजात गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह वा गणवेश वाटप करून गौरविण्यात येते.

त्यासोबतच विवेक प्रभाकर गोविंदवार, चितांगराव कदम, गणेशराव माने , संजय सुरेश माने, निवृत्ती थोरकर, कोंडबाराव मारोतराव माने, गणपत किसन पसलवाड ,बापुराव कोंडबाराव माने, श्रीमती शारदाबाई नागोराव माने, श्रेयस दिनकर थोरकर ,शंकर साहेबराव माने, सौ संगीता रामभाऊ इंगळे, केशवराव गणपत पवार, विश्वंभर मारोतराव वानखेडे, रामकिसन सदाशिव भोसले, आयेशाबी शेख नबी, रत्नाकर यादव गोविंदवार, नारायण देवराव माने, उत्तमराव विठ्ठल माने, अशोकराव जांबुवंतराव माने, कल्याणराव लालजी माने, राजू आनंदराव माने, किसनराव जीवनराव माने, शामराव मारोतराव माने, गजानन साहेबराव माने, दादाराव रंगराव माने, संजय बिदाजी वाठोरे, वसंता रामजी कवडे, प्रणव सुभाषराव पवार, दादाराव मारोतराव माने ,सतीश दादाराव माने दत्तराव कोंडबाराव माने, प्रकाशराव कोंडबाराव माने, अशोकराव बापुराव माने, शिवराम मनोहर मगरे, शिवाजी हरीचंद्र देवसरकर , दिलीपराव गणपतराव काळे, सुधाकर रामन माने, निरंजन उत्तम माने, शामराव झेलबा माने, संजय देवराव माने पौर्णिमा राजेश वाठोरे, सुरेखा मानकोस्कर मॅडम, आनंद दिगंबर माने तसेच शैक्षणिक सत्र 2021 ते 22 पासून 1984 – 85 वर्ग 10 वी चे बॅच कडून विद्या प्रोत्साहन बक्षीस.

वरील सर्व दाते मंडळी कडून गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक म्हणून रोख देण्यात येते.

गेली चाळीस वर्षांपूर्वी पासून श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय चातारीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसांची परंपरा आज रोजी पर्यंत अखंडपणे चालू तर आहेच तसेच इतर कोणत्याही शाळेत अक्षरशः इतक्या मोठ्या प्रमाणात होणारी बक्षिसांची मांदियाळी दिसून येत नाही.

ग्रामीण भागातील बरीचशी मुले ही परिस्थितीने नाजूक असल्यामुळे शहरात शिक्षण घ्यायला जाऊ शकत नाहीत आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे असेच विद्यार्थी शहरी भागात शिक्षण घ्यायला जातात.

त्यांच्यापैकी बरीचशी मुलं हुशार आणि कुशाग्र बुद्धिमत्तेची असतात.

अशावेळी ग्रामीण भागात शिक्षण घेतात ती सर्वसाधारण असतात त्यांना घडविणे आणि गुणवंतांच्या यादीमध्ये प्रविष्ट करणे हे काम तसे पाहिले तर खूप अवघड आहे परंतु शालेय व्यवस्थापन , शिक्षक पालक आणि देणगी दात्यांच्या सहयोगामुळे ते चातारीमध्ये शक्य होतांना दिसते आहे.

चातारी सारख्या दुर्गम भागात अशाप्रकारचे शिक्षण क्षेत्रातील पावन काम यशस्वी होताना आपण सर्वजण पाहतो असेच विद्यार्थी घडविणारे पावन काम इतरही खेड्यात व्हायला पाहिजे, त्यासाठी ग्रामीण भागातील देणगी दात्यांनी पुढे येऊन विद्यार्थ्याना देणगी देऊन प्रोत्साहित करायला पाहिजे जेणेकरून त्यामाध्यमातून सक्षम हुशार आणि कुशाग्र बुद्धिमत्तेच्या पिढ्या निर्माण व्हायला हातभार लागेल.

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय चातारी येथे गुणवंत विद्यार्थी कौतुक व बक्षीस वितरण सोहळा दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी ध्वज फडकवल्यानंतर पार पडला.

त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य गणेशराव माने सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बापुराव माने सर, दादाराव पाटील,सरपंच सौ रंजनाताई माने, अशोकराव नानाराव माने, रामभाऊ हामंद, माजी पोलीस पाटील शिवाजीराव माने , भाऊराव पाटील, सदाशिव वाठोरे ,मधुकर वाठोरे ,शेषराव पाटील, शामराव माने, अमोल देवीदास माने तसेच संपूर्ण दाते मंडळी उपस्थित होती.
माजी प्राचार्य गणेशराव माने सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून गुणवंत विद्यार्थ्यांच कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि देणगीदार मंडळींचे आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रसाद पेंटेवाड सरांनी केले सूत्रसंचालन संतोष माने तर आभारप्रदर्शन गौरव रावते यांनी केले.