पत्रकार वारीसे हत्या प्रकरण जलदगती न्यायालयाकडे वर्ग करा…!

29

🔸वृत्तपत्र वार्ताहर संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 20 फेब्रुवारी):-कोकणातील पत्रकार शशीकांत वारीसे यांची चारचाकी वाहनाखाली चिरडून अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली या अमानुष घटनेचा उमरखेड तालुका दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाने तिव्र निषेध नोंदवित सदर प्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी होऊन प्रकरण जलदगती न्यायालयात वर्ग करून मृत्तकाचे कुटुंबियांना शासन स्तरावर योग्य ती आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपविभागिय अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

वारीसे यांची हत्या ही लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर झालेला आघात असून लोकशाही मार्गाने लोकहितविरोधी घटनां विरुद्ध आवाज उठविणाऱ्या पत्रकारांना संपविण्याचा व लोकशाही मुठीत ठेवण्याचा समाज कंटकांचा हा डाव असल्याचे दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाने निवेदनात म्हटले आहे .

यावेळी संघाचे अध्यक्ष निळकंठ धोबे, सचिव लक्ष्मीकांत नंदनवार, वसंतराव देशमुख , अजय कानडे ,अझहरउल्ला खान , शैलेश ताजवे ताहेर मिर्झा , सलमान अशहर खान, डॉ . शिवचरण हिंगमिरे गजानन भारती . प्रशांत भागवत बाळासाहेब ओझलवार अंकुश पानपट्टे. अविनाश मुन्नरवार . डॉ विशाल माने .अरुण बेले.प्रा.प्रदिप इंगोले.सागर शेरे. साहेबराव धात्रक. रवी भोयर . व्यंकटेश पेन्शनवार संजय देशमुख आदिंची उपस्थिती होती.