राजेशाहीत लोकशाही निर्माण करणारा आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज – महेंद्र ब्राम्हणवाडे

35

🔸माणसे जोडनारा राजा शिवाजी महाराज – डॉ. नामदेव किरसान

🔹आंबेशिवणी टोली येते शिवजयंती साजरी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.21फेब्रुवारी):-तालुक्यातील आंबेशिवणी (टोली ) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात गडचिरोली जिल्हा काँग्रेचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करून आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण व द्विपप्रज्वलन करून झाली. अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान उपस्थित होते.

वर्तमान परिस्थितीत लोकशाही मार्गाने निवडून येणारे राजे हुकूमशाह बनून प्रशासन करत आहे, तर 350 वर्षा पूर्वी असा एक राजा होऊन गेला ज्यांनी राजेशाही मध्ये सुद्धा लोकशाही निर्माण करून गोरगरीब, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा स्वराज्य निर्माण केला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. आजच्या केंद्रातील आणि राज्यातील सरकारणे छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श ठेऊन कार्य करण्याची गरज आहे, असे मत गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवरायांची शिकवन ही माणसे जोडणारी असून त्यांनी सर्व धर्माचा आदर केला त्यांच्या सैन्यात हिंदू सोबत मुसलमान सरदारही होते, त्यांनी आपल्या कारकिर्दीत माणसे तोडली नही तर माणसे जोडली त्यामुळेच स्वराज्यासाठी जीव देणारे तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद सारखे मावळे तयार झाली, असे मत डॉ. नामदेव किरासन यांनी अध्यक्षीय भाषनातून व्यक्त केले.

यावेळी मुख्य अतिथी म्हणून प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत,, वसंत चुधरी, भास्कर धनफोले, संध्याताई झजाळ, प्रशांत भैसारे, मंडळाचे सदस्य प्रफुल साखरे, गणेश गुंतीवर, युजिन चौधरी . दुषांत मगर, श्याम कावळे, प्रशांत पेद्राम, अमित चौधरी, मोठ्या संख्येने गावातील युवक, महिला, आणि नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप कोहळे यांनी केले.