‘आसमानी किताब’ म्हणुन पवित्र कुरआनाचा आदर करणारे छत्रपती शिवराय – प्रा.सय्यद सलमान

34

🔸जळका भडंग पि.राजा येथील शिवजयंती निमित्ताने व्याख्यानात प्रतिपादन]

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

यवतमाळ(दि.23फेब्रुवारी):-दिनांक 20 फेब्रुवारी रोजी पिंम्पळगाव राजा येथील जगळा भंडग या गावात रात्री 8 वाजता शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपति शिवाजी महाराज इस्लाम,समज गैर गैरसमज या विषयावर व्याख्यान ठेवण्यात आले होते या मध्ये प्रसिद्ध व्याख्याते पुसद येथील सय्यद सलमान सरांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन ऍड.श्यामल गायगोळ मित्रमंडळ यांनी केले होते व जमाअते इस्लामी हिंद पि.राजा यांच्या मार्गदर्शना नुसार कार्यक्रम नियोजित करण्यात आले.या कार्यक्रमामध्ये पि.राजाचे ठाणेदार आडे साहेब,सरपंच,व गावातील सर्वच जाती धर्माचे बांधव उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल समाजात काही राजकिय मंडळी गैर समज पसरवितात ते दूर करण्यासाठी अशे कार्यक्रम ठेवणे आवश्यक आहे..ही भावना कार्यक्रमाचे आयोजक ऍड,श्यामल गायगोळ यांनी व्यक्ती केली व एक हिंदू मंडळ कार्यक्रमाचे आयोजन करतो आणि त्यात एक मुस्लिम व्याख्याता शिवरायावर बोलतो ही एक अभिमानाची बाब आहे. कार्यक्रमात मुख्य व्याख्याते सय्यद सलमान सरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा व्यापक इतिहास सांगितला छत्रपती शिवाजी महारांज चरित्रवाण होते,धार्मिक होते परंतु धर्मांध नव्हे,शिवरायांचे गुरू मुस्लिम संत याकूत होते तर शिवरायांच्या काकाचे नाव सुद्धा मुस्लिम संत शाशरीफ याच्या सन्मानाणे ठेवण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात कधिच भेदभाव केला नाही सर्व अठरा पगड जातींना घेऊन राज्य निर्माण केलं, कधीच जातीच्या आधारावर नियुक्त नाही केली तर गुणवत्ता हाच आधार होता, छत्रपति शिवाजी महाराजांनी आदेश दिलासा होता की जर मोहिमे दरम्यान अस्मानी ‘किताब म्हणजे पवित्र कुरआनाची परत कुठ दिसली तर त्याला सन्मानपूरक मशिदीत ठेवा आणि मुस्लिम संत याकूत यांच्या खर्चासाठी कोकणात केळशी येथे 653 एकर जमीन आज्ञपत्राने इनाम दिली.

शिवाजी महाराजांना जेव्हा जिजियासाठी औरंगजेबला पत्र लिहिले त्यात जिजिया कोण घेऊ शकतो याबद्दल अभ्यासपूर्ण माहिती ही कुरआन बद्दल सांगितले की त्यात ईश्वर सर्वांसाठी आहे फक्त मुसलमानाचा नाही ही समज औरंगजेबला दिली तसेच शिवाजी महाराजांनी आपल्या मुसलमान प्रजेसाठी रायगडावर मशिदसुद्धा बांधली होती तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक निष्ठवन्त सैनिक मुस्लिम होते स्वराज्याचा पहिला सरनोबत नूरखान, आरमार प्रमुख दर्या सारंग,अंगरक्षक इब्राहिम खान,आग्र्याहून सुटके प्रसंगीसोबत असणारा मदारी मेहतर, वकील व सचिव काझी हैदर अशे अनेक मुस्लिम सैनिक छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत व विश्वासू होते तसेच 700 मुस्लिम पठाण स्वराज्यात सामील झाले होते हा होता छत्रपति शिवाजी महाराजांचा धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन दुसरीकडे औरंगजेबचा विश्वासु सरदार मिर्झा राजे जयसिंग हा हिंदू होता तर अफजल खानचा वकील हा कृष्णा भास्कर कुळकर्णी हा हिंदू होता.

या यांवरूनच कळले की त्यावेळची लढाई युद्ध हे राजकीय होते तर धार्मिक नव्हते हे समजणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम मावळे होते तर मुस्लिम राजाच्या सैन्यात हिंदू सुभेदार व सैनिक होते म्हणून त्यावेळची लढाई, युद्ध व निती ही राजकीय व सत्तेसाठी होती धार्मिक नाही होती अश्या प्रकारे पुसद येथील सय्यद सलमान सरांनी सँदर्भासहित अभ्यासपूर्ण व वैचारिक भाषण केलं आयोजक आणि श्रोत्यांना खूपच आवडलं आणि सरांनी टाळ्यांचा गर्जाव केला.पुसद येथील सलमान सर हे एक मराठी संत साहित्यात संशोधन करत आहे.

व अश्या प्रकारे महापुरुषांवर व्याख्यान देऊन जातीय सलोखा,सदभावना राष्ट्रीय एकात्मता निर्माण करतात.

सलमान सरांचं मराठी भाषेवर प्रेम आणि प्रभुत्व असल्यामुळे सर आशया प्रकारचे समाजातील गैर समज दूर करून समाज जोडण्याचे कार्य करतात सरच्यव या कार्यामुळे त्यांना नूकताच कोल्हापूर येथे राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाला आहे.