रमाई आवास योजने करिता वाढीव अनुदान देण्याची मुख्यमंत्री यांच्याकडे केली मागणी. रोहिदास लांडगे – महाराष्ट्र जनक्रांतीसेना

30

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.23फेब्रुवारी):-सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थींना रमाई आवास योजना असल्यामुळे शासनाच्या वतीने अडीच लाख रुपये कमी अनुदान मिळत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये महागाईचा काळ असल्यामुळे निधी कमी आहे. घरकुलासाठी वाढवून देण्यात यावा.पाच लाख रुपये अनुदान शासन निर्णय काढण्यात यावा.अशी मागणी महाराष्ट्र जनक्रांती सेना च्या वतीने संस्थापक/ अध्यक्ष रोहिदास लांडगे यांनी मा.एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदनाद्वारे केली आहे.

रमाई आवास योजना चा लाभ देत असताना कोरोना परिस्थिती नंतर महागाईचा भस्मासुर वाढत असल्यामुळे घरकुलासाठी लागणारे साहित्य ,घरकुलाची मजुरी अडीच लाख रुपये अनुदान कमी पडत आहे त्यामुळे संबंधित लाभार्थ्याला कर्जबाजारी होऊन घराचे स्वप्न पूर्ण करावे लागत आहे. अनुसूचित जातील काही बांधव आर्थिक दृष्ट्या अनुसूचित जाती समाज सक्षम नसल्यामुळे संबंधित कुटुंब महागाईच्या काळात कशीतरी जीवन काढत आहेत त्यामुळे वाढीव रक्कम पाच लाख रुपये अनुदान देण्यात यावी अशी मागणी रोहिदास लांडगे,ज्ञानोबा मोरे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांना केली आहे