प्रा राम मेघे इंजिनीअरिंग अँड मॅनॅजमेण्ट येथे गाडगे बाबांच्या १४७ व्या जयंती निमित्त्य दशसुत्री संदेशचे प्रभावीपणे वाचन

29

✒️बडनेरा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

बडनेरा(दि.23फेब्रुवारी):- राष्ट्रीय सेवा योजना प्रा राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनॅजमेण्ट, बडनेरा अमरावती येथील विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग व शिकेत्तर कर्मचारी यांनी द्वारा गाडगे बाबा यांच्या १४७ व्या जयंती निमित्त्य दशसुत्री संदेशचे प्रभावीपणे वाचन करीत तो अंगीकृत करण्याची शपथ आज दिनांक २३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता सर्व विभागाच्या चालू वर्गात संपन्न झाला तसेच सर्वांना गाडगे बाबांबद्दल माहिती पण देण्यात आली.

डेबुजी झिंग्राजी जानोरकर म्हणजे आपले गाडगे महाराज यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगांव येथे झाला आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे थोर संत, समाजसुधारक आणि कीर्तनकार डेबुजी झिंग्राजी जानोरकर यांची आज १४७ वी जयंती.अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचं उच्चाटन हेच गाडगेबाबांचे ध्येय होते. दुर्बल, अनाथ, अपंगांची ते नेहमी सेवा करायचे. संत गाडगेबाबा जिथे कुठे जायचे तेथील रस्ता स्वच्छ करण्याचे काम हाती घ्यायचे. गावातील अनेकांनी दिलेला पैसा त्यांनी समाजविकासाठी खर्च केला. या पैशांतून त्यांनी गावांमध्ये शाळा, धर्मशाळा, रुग्णालय आणि जनावरांसाठी निवारा बांधला. त्यांचे हे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. गाडगे महाराज चालते फिरते सामाजिक शिक्षक होते.

कार्यक्रमाची रूपरेषा रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. आशिष सायवान यांनी मांडली तसेच गाडगे बाबांचा दशसुत्री संदेशचे प्रभावीपणे वाचन रासेयोच्या महिला कार्यक्रम अधिकारी प्रा गायत्री बहिरे तसेच रासेयोचे सह-कार्यक्रम अधिकारी प्रा अतुल डहाने, प्रा. शुभम कदम, प्रा आशुतोष उगवेकर, प्रा. अनुराधा इंगोले, प्रा अपर्णा खैरकर, क्रीडा विभागाचे डॉ एन एस विघे, श्री. निशांत केने व रासेयो स्वयंसेवक यांच्या सहभागातून त्यांच्या विभागाच्या चालू वर्गात केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग व शिकेत्तर कर्मचारी यांनी सहभाग दिला.

कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजना करता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. अली, संगाबाअवि चे रासेयो संचालक डॉ. राजेश बुरंगे, अमरावती जिल्हा ग्रामीण चे समन्यवक डॉ नरेंद्र माने, बडनेरा क्षेत्रीय समन्यवक प्रा. सारंग धावडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीनजी धांडे, उपाध्यक्ष अॉड. उदयजी देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. हेमंतजी देशमुख, सचिव युवराजसिगजी चौधरी, सदस्य शंकररावजी काळे, नितीनजी हिवसे, सौ. रागिनीताई देशमुख, डॉ. सौ. वैशालीताई धांडे व डॉ. सौ. पुनमताई चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या.