शालेय पोषण आहाराच्या घोटाळ्यात जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर मुख्याधिकारी कडून अद्यापही कारवाई नाही..!

33

[माहिती अधिकारात मागितलेली माहिती गोपनीय असल्याचे सांगून कार्यालयीन अधीक्षक बावलगावे यांच्याकडून देण्यास तळासा प्रकरण दडपडण्याचा प्रयत्न – संपादक इरफान शेख यांचा आरोप.!]

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड (दि. 26 फेब्रुवारी):-उमरखेड नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या उर्दू माध्यमिक व हजी अमान उल्ला जहागीरदार उच्च माध्यमिक विद्यालय माहे अगस्त 2022 मध्ये शालेय पोषण आहार मध्ये घोटाळा करण्यात आला होता तांदळाचे चण्याचे कट्टे व 35 ते 40 खाली बारदाने रंगेहात नागरिकांनी पकडले.

त्यानंतर मुख्य अधिकारी महेश जामनोर यांनी प्रकरण शालेय पोषण आहार अधिकारी यांच्याकडे चौकशी करिता पाठविले सदर प्रकरणाची चौकशी शालेय पोषण आहार अधिकारी तथा गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे सुप्रिया झाली गटशिक्षणाधिकारी व शालेय पोषण आहार अधिकारी यांनी आपल्या चौकशी अहवाल मुख्याधिकारी उमरखेड यांच्याकडे पाठवून बराच कालावधी झाला आहे.

प्रकरणालाही जवळपास सहा ते सात महिने होत आहेत परंतु मुख्याधिकारी यांनी अद्यापही संबंधित जबाबदार व्यक्तींवर कोणतीही कारवाई केली नाही तसेच या प्रकरणातील तक्रार करते सिद्धिक राज व माजी नगरसेवक मुजीब बागवान हे देखील गप्प आहेत.

याबाबत संपादक विलासराव चव्हाण व संपादक इरफान शेख यांनी माहिती अधिकारात माहिती व चौकशी अहवालाचे प्रत मागितली असता सदर चौकशी अहवाल गोपनीय आहे तो देता येत नाही असे संपादक इरफान शेख यांना कार्यालयीन अधीक्षक तथा जन माहिती अधिकारी बावलगावे यांनी तोंडी सांगून माहिती देण्यास नकार दिला आहे.

वास्तविक पाहता सदर प्रकरणाची तक्रार असूनही तक्रार कर्त्यांचे व घटनेचा पंचनामा करणारे नगरपरिषद कर्मचारी यांचे व साक्षीदाराचे बयान घेण्यात आले किंवा नाही काही करायला मार्ग नाही व सर्व उपलब्ध पुरावे असताना देखील जबाबदार दोषी व्यक्तींवर मुख्याधिकारी यांनी कोणतीही कार्यवाही करू नये व अधीक्षक यांनी माहिती देण्यास टाळाटाळ करावी याचाच अर्थ प्रकरण दडपविण्यात येणार आहे. असा आरोप संपादक इरफान शेख यांनी बोलताना केला आहे.

संपादक विलास चव्हाण व संपादक इरफान शेख यांनी माहिती अधिकारात माहिती मिळत नसल्यामुळे मुख्याधिकारी यांच्याकडे प्रथम एप्रिल दाखल केली आहे या गंभीर प्रकरणाकडे प्रशासन तथा उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी दखल घेऊन तांदूळ घोटाळा प्रकरणातील संबंधित जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकारी उमरखेड यांना द्यावे असे ते म्हणाले.