मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

34

✒️पुसद प्रतिनिधी(स्वप्निल गोरे)

पुसद(दि.27फेब्रुवारी):-फुलसिंग नाईक महाविद्यालयात मराठी विभागाच्या व मराठी भाषा व साहित्य मंडळाच्या वतीने २७ फेब्रुवारी हा दिवस विष्णु वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन ‘ म्हणून महाविद्यालयातील सांस्कृतिक सभागृहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. अरुण पाटील सर होते. त्यांनी मातृभाषा मराठीचे शैक्षणिक धोरण २०२० महत्त्व विशद केले. तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक प्रा. मारोतराव जाधव होते. त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मातृभाषा मराठीला मिळणारे दुय्यम स्थान याविषयी खंत व्यक्त केली.

त्याशिवाय मराठी भाषेचा इतिहास मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व सांगितले. तर डॉ. अनिता कांबळे मॅडम यांनी महाविद्यालयीन तरुणांना वाचनाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रल्हाद वावरे सरांनी व कु. वैष्णवी जगताप केली. तर सूत्रसंचालन स्वप्नील गोरे यांनी केले. आभार प्रदर्शन कु. कोमल भिसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मराठी विभागातील प्रा. अभिषेक शिरमवार तसेच मराठी भाषा व साहित्य मंडळाचे सदस्य नागसेन सुरोशे, अब्दुल आयान, राहुल राठोड, अभिजीत राठोड, रोहन राठोड, कु. वैष्णवी रुणवाल, कु. काजल उबाळे, कु. शिवानी चव्हाण कु. गौरी राठोड कु. पल्लवी ढोले कु. दीपा खंदारे यांनी सहकार्य केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी हजर होते.