मराठा समाजाच्या योगा भवनासाठी दोन कोटी रुपये मंजुर..!!

67

🔸पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरदभाऊ मैदं यांच्या प्रयत्नाला यश..!!

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.1मार्च):- येथील अर्बन बॅक पुसद येथे दि.27/02/23 रोजी शरदभाऊ मैन्द यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून मराठा समाजासाठी शासणाकडुन मंजुर झालेला निधी या बाबत विनीमय विचारसरणी करण्यात आली व सर्वान समोर माहीती देण्यात आली.

खा.भावना गवळी यांचे आभार मानण्यासाठी पत्रकार परिषद बोलवुन आभार मानले,बऱ्याच दिवसा पासुन पुसद नगर परिषद अंतर्गत प्रभाग क्रंमाक15 मधील लेआऊट समोरील गिरीराज ओपन पेजमधील 30हजार स्केअर फुटाची जागेमध्ये भव्यदिव्य मराठा योगा भवण उभारण्याचा मानस आहे या भवना मध्ये स्टडी सर्कल,,वाचणालय,अभ्यासिका व इत्तर सर्व प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतील या मराठा योगा भवनामध्ये केवळ मराठा समाजाच्याच मुला-मुली,करिता नसुन सर्व जातीधर्माच्या मुला मुली करीता निशुल्क राहील आसे या वेळी शरदभाऊ मैंद यांनी बोलतानां मनोगत व्यक्त केले आंहे.

सदरील निधी उपलब्ध करण्यासाठी शरदभाऊ मैदं यांनी वेळोवेळी पाठपुरावा देखील करण्यात आला असुन त्याचा पत्रव्यवहार सात्यत्याने सुरूच होता त्यामुळे त्यांच्या प्रयत्नास यश प्राप्त झाले आहे.या अशा उपक्रमामुळे अनेकाचे जिवन उदाः शैक्षणीक घेणाऱ्या मुला-मुलीचे भवितव्य उज्वल झाल्याशिवाय राहणार नाही.

शरदभाऊ यांनी सदरील निधी मंजुर घेण्यासाठी मराठा समाज बांधवातर्फे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिदे,व यवतमाळ जिल्ह्याच्या खासदार भावना गवळी यांचे विशेष करूम आभार मानले आहे.पुसद शहरातील नगर परिषद अंतर्गत गिरीराज पार्क या जागेवर मराठा समाज योगा भवण मिळवुन देण्यासाठी पुसद नगरपरिषदचे मुख्याधिकारी डॉ.कीरण सुकलवाड ,अभीयंता गिरीष डुब्बेवार,यांनी देखील अतिशय मोलाचे सहकार्य केले,