महापुरुषांचे फोटो असलेले पेपर पॅड परीक्षा केंद्रावर जमा करावे

34

🔸कला फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत दामले यांचे मत

✒️सुनील शिरपुरे(झरीजामणी प्रतिनिधी)

दहावी आणि बारावीची परीक्षा सुरु होत आहे. त्या पूर्वी सांगावेसे वाटते की, परीक्षा देत असतांना खूपवेळा पेपर पॅडवर
महापुरुषांचे फोटो असतात. पेपर पॅडवर महामानवाचे फोटो आहेत. ही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे मानतो. पण तितकेच वाईट देखील आहे. कारण पेपर देत असतांना महापुरुषांच्या फोटोवर पेपर ठेवून पेपर लिहिणे हे कुठवर योग्य आहे. ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पेपर पॅडवर दिसून येतात.

त्यांच्या फोटोवर पेपर ठेवून लिहिणे म्हणजे आपण त्यांचा खूप मोठा अपमान करत आहो. याचा आपण कुठंतरी विचार केला पाहिजे, पेपर पॅड निर्मितीवर आपण आढा घातला पाहिजे. महापुरुषांच्या फोटोऐवजी कार्टून्स, निसर्गरम्य, पक्षी, नदी असे अनेक चित्र छापावे. ज्या पेपर पॅडची छपाई झाली. ज्यावर महापुरुष असतील अशा पेपर पॅडला परीक्षा केंद्रावर जमा करावे. अशी चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यावी. असे मत कला फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत दामले, समाजिक कार्यकर्ते गणेश चौधरी, प्रवीण घनबहादूर, विशाल दामले, ऋषिकेश पडांगे, मंगला ढोके, रीना दामले, यांनी विद्यार्थ्याना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा देऊन आपले मत व्यक्त केले आहे.