वृध्द कलावंत मानधन शासकीय समिती तातडीने गठीत करून कलावंताचे प्रलंबीत प्रस्ताव मंजूर करण्यात यावे

96

शासन बदलले की सर्व शासकीय समित्या बरखास्त केल्या गेल्यात त्याचा फटका सर्वाधिक सर्व सामान्यांना मिळणा-या शासकीय लाभाच्या योजनेवरील लाभार्थीना झाला. शासनाचे नियमित मिळणारे मानधन तथा प्रक्रीया रखडल्याने त्यांचे कौटूबीक जिवन प्रभावीत झाले आर्थीक कंबरडे मोडून पडले ऊपासमार व हाल अपेष्टा सूरू झाल्यात.

गाव खेड्यातील व शहरातील गोर गरीब ऊपेक्षीत भजन गायन व प्रबोधन करणारी भजन मंडळी/कलावंत हा समाजातील असाच शासनाच्या ह्या निर्णयाने प्रभावित झालेला संवेदनशील घटक आहे समाजात कीर्तन, भजन गायन ई. कलेच्या सादरीकरणावर ऊपजिवीका करतो.अलीकडे हा घटक लोकाश्रयापासून व राजाश्रयापासून देखील दूरावत गेला आहे. ग्रामीण भागात प्रत्येक गावात किमान तिन ते चार पूरूष,महीलांची भजन मंडळे असायची मात्र आता मनोरंजनाची साधने बदलली तसे भजन मंडळा चे विस्तारीत होण्याचे प्रमाण घटले.

यूवा वर्गाने कला जोपासण्या कडे पाठ फीरवली मात्र साधने व स्वरूप कितीही बदलले तरीही महाराष्ट्रात राष्ट्रसंत तूकडोजी महाराज, गाडगे महाराज तथा समस्त महापूरूषाच्या प्रेरणेनी व विचारावर चालणारी जय गूरूदेव सेवा भजन मंडळी, वारकरी मंडळी, सर्वधर्मीय कला व सांस्कृतिक मंडळी, किर्तनकार, नाटक पथनाट्य,भारूड, पोवाडा, शाहीरी ई. द्वारा समाज प्रबोधन करणा-या मंडळीनी आपल्या कलेच्या ताकदीवर गावखेड्यापर्यंत कला जिव॔त ठेवली. आजही त्याच्या कला सादरीकरणाला लोकांची तूंबळ गर्दी खेचण्याची ताकद आहे. ही प्रचंड ताकद एकजूट करून कलावंतांना स्वाभीमानाने जगण्यासाठीच्या मागण्या, समस्या, प्रश्न व त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासोबतच शासनाने गोरगरीबांच्या कल्याणासाठी मंजूर केलेल्या योजनाचा प्रचार प्रसार करण्यासाठी शासनाच्या खांद्याला खांदा लावून प्रभावी पणे कार्य करण्यास महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे समस्त पदाधिकारी संपूर्ण ताकदीनीशी शासनाच्या व कलावंतांच्या पाठीशी ऊभे राहून प्रश्न सोडविण्यात अग्रभागी आहे.

कोरोना काळात हातावर पोट असणारे मजूर, कामगार ह्याचे जिवन जगणे असह्य झाले होते. त्यात एकल कलावंत जो आपल्या कलेच्या सादरीकरणावर ऊपजिवीका करतो, त्या कलावंताची सूध्दा ऊपासमार झाली, त्यांना तात्काळ अर्थसाहाय्य मंजूर करा, ह्या मागणी साठी समितीने रस्त्यावर ऊतरून निदर्शने व तिव्र आंदोलनातून दमदार लढा दिला, परिणामी शासनाने सहानूभूतीपूर्वक विचार करून कोरोना पार्श्वभूमीवर प्रयोगात्मक क्षेत्रातील एकल कलावंताना सरसकट पाच हजार रूपये अर्थसहाय्य मंजूर केलेत व निधीची तरतूद सूध्दा केली, मात्र शासन बदलले की ह्या मदतीचे वाटप रखडले आहे.

अनेक कलावंत ह्या अर्थ सहाय्यापासून वंचीत राहीलेत व मंजूर निधी आपणास मिळत नाही. ह्याचे दूःख अजून विसरले नाही. तोच वृध्द कलावंत शासकीय समिती बरखास्त होवून एक वर्षाचा कालावधी होत आला तरी समित्या गठीत झाल्या नाहीत. त्यामूळे त्यांचा जिव पून्हा टांगणीला लागला. हा प्रश्न शासनाने प्राधान्याने सोडवावा ह्या करीता समितीचे पदाधिका-यांचे शिष्टमंडळानी सांस्कृतिक मंत्री ना. सूधीर भाऊ मूनगंटीवार साहेबाची भेट घेवून ह्या सर्व कलावंतांना भेडसावणा-या गंभीर समस्या मांडल्या व त्यासाठी सतत पाठपूरावा करीत आहे, लवकरच चंद्रपूर येथील त्याचे निवासस्थानी समितीचे राज्य कार्यकारीणीचे पदाधिकारीसह शिष्मंडळानी दिनांक 12 मार्च रोजी भेट घेण्याचे ठरविले आहे. त्यामधे कलावंताच्या जिवनावश्यक सर्व मागण्यावर चर्चा करण्यात येत आहे. ह्यात प्रामूख्याने तिनही श्रेणीच्या कलावंताचे मानधनात वाढ करून किमान पाच हजार रूपये ईतके मानधन करावे, कोरोना पार्श्वभूमीवर अर्ज केलेल्या पात्र एकल कलावंतांचे मंजूर अर्थसहाय्य निधीचे वाटप तात्काळ करावे.

जिल्हानिहाय वृध्द कलावंतांच्या मंजूरातीचे लक्ष वाढवून दूप्पट करावे,वृध्द कलावंत मानधन प्रस्ताव मंजूराती मधे समितीने प्रत्येक तालूक्याला किमान समान वाटा देण्याचे लक्ष ठेवावे मानधनासाठीची ऊत्पन्न मर्यादा एक लाख रूपये ईतकी करावी वयोमर्यादा चाळीस वर्ष करावी, कलावंत मानधन समितीचे अशासकीय सदस्य नेमतांना शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे अधिकृत कला पारंगत दर्जेदार, अनूभवी व न्याय देणारे कलावंत घ्यावेत. कलावंतांना एस टी बस मोफत प्रवास सवलत द्यावी, बेघर कलावंताना प्राधान्याने घरकूल मंजूर करावे, भजन गायन करणा-या महीला मंडळाला भजनी साहीत्य वाटपात प्राधान्य द्यावे, कलावंताच्या आर्थीक सक्षमीकरणासाठी राज्यस्तरावर कलावंत आर्थीक विकास मंडळ गठीत करून थेट कर्ज योजना सूरू करावी, ग्रामीण तथा शहरी भागातील पंजीकृत मंडळाला शासकीय निधीतून कलावंत भवन बांधणीसाठी शासकीय जागा व निधी मंजूर करावा, शालेय अभ्यासक्रमात कला-संगीत हा विषय घेवून कलेचा सांस्कृतिक वारसा यूवा वर्गामधे जोपासणे व वृध्दिंगत करण्याचे नियोजन करावे. या मागण्या मांडण्यात येत आहेत.

महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ दादा गायकवाड ह्याचे नेतृत्वात दमदार वाटचाल सूरू असून राज्यभर समितीच्या शाखांचा विस्तार तळागाळातील गावखेड्यापर्यत पोहचविला असून महाराष्ट्राच्य 36 जिल्ह्यात विभागीय प्रमूख, जिल्हा व तालूका प्रमूख रचना करण्यात आली असून गाव खेड्यापर्यत सदस्य नोंदणीचे पाच लाखाचे वर लक्ष गाठले आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोप-यात गावखेड्यात तथा वाडे तांड्यावर असलेल्या कलावंताना आवाहन करण्यात येते की आपण एकजूट होवून आपल्या भजन गायन मंडळाचे पूरूष व महीला मंडळातील सर्व कलावंतांनी आपल्या हक्काच्या समितीचे सदस्य बनावे व आपल्या समस्त कलावंत बांधवाच्या व भगिणींच्या समस्या शासनासमोर मांडण्यासाठी व आर्थीक लाभ पदरात पाडून घेण्यासाठी समितीला सहकार्य करावे.

✒️ॲड.श्याम खंडारे(प्रदेश महासचीव,महा. कलावंत न्याय हक्क समिती)