दिवट पिंपरी येथे मिलिंद महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर संपन्न

32

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.9मार्च):-मिलिंद महाविद्यालय मुळाव्याच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत तालुक्यातील दिवट पिंपरी येथे सात दिवशीय विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते . या शिबिराचे उद्घाटन 24 फेब्रुवारी रोजी आमदार नामदेव ससाने यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी माजी शिक्षण सभापती प्रकाश दुधेवार, पत्रकार संतोष मुडे, सिद्धार्थ कांबळे ,आनंद सुरोशे ,ग्रामसेवक व्ही बी मुंडे , मुख्याध्यापक डी आर केंद्रे, प्रो डॉ अनिल काळबांडे , डॉ . जयमाला लाडे , प्रा . क्रांती मुनेश्वर , डॉ . प्रदिप इंगोले, डॉ विश्वास दामोधर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळच्या सत्रामध्ये आरोग्यविषयक तपासणी शिबिर वैशाली धोंगडे तालूका समुपदेशक, निशांत कदम उपजिल्हा रुग्णालय उमरखेड यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये जवळपास शंभर ग्रामस्थ सह विद्यार्थ्यासह याचा लाभ घेतला यामध्ये सी बी सी .एस , थायरॉईड , सिकलसेल , हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली .दुपारच्या बौद्धीक सत्रामध्ये प्रा .सुनील काळबांडे , बिटरगाव , यांनी एचआयव्ही रोगाबद्दल सविस्तर माहिती अतिशय सोप्या भाषेत दिली तर तालुका समुपदेशक वैशाली धोंगडे यांनी , एचआयव्ही आजार कसा होतो व त्याचा प्रतिबंध कसा करावा यावर सविस्तर माहिती दिली .

यावेळी इनरव्हील क्लबच्या सचिव उषा तास्के, डॉ . जयमाला लाडे , प्रा .क्रांती मुनेश्वर ,डॉ अनिल काळबांडे उपस्थित होते . तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये परिसरातील ग्रामसफाई , नाले सफाई , गांजर गवत निर्मूलन त्याचबरोबर ‘बेटी बचाव बेटी पढाव ‘ ही जनजागृती रॅली गावातून काढण्यात आली. दुपारच्या बौद्धीक सत्रात ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी उमरखेड येथील कवाने अकॅडमीचे प्रा . अमोल गव्हाणे , पोलीस पूर्व भरती केंद्राची धीरज पवार यांनी, विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले . चवथ्या सकाळ च्या सत्रात शालेय परिसरातील वृक्षाना आळे करून पाणी देण्यासाठी दांडाची निर्मिती करण्यात आली . दुपारच्या बौद्धिक क्षत्रामध्ये , महिला सक्षमीकरण व बेटी बचाव ‘ या विषयावर जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्ष सरोज देशमुख यांनी महिलांनी , आपल्या पायावर उभे राहील्या शिवाय सक्षम होणार नाहीत त्या साठी स्वतःच्या पायावर उभे रहा असे आवाहन केले .

या वेळी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मुख्याध्यापक सुनिता कांबळे , प्रा विश्राती मुनेश्वर यांनीआपल्या गझल आणि कविता सादर केल्या यावेळी मराठी विभाग प्रमुख प्रा . डॉ .अनिल काळबांडे यांनी मराठी भाषा दिनाचे महत्व सांगीतले या वेळी प्रा .क्रांती मुनेश्वर उपस्थित होत्या .पाचव्या दिवशी सकाळी स्मशानभूमीची साफसफाई करण्यात आली . दुपारच्या बौद्धिक सत्रा मध्ये ,आर. एन . शिंदे ,कृषी पर्यवेक्षक उमरखेड यांनी , शेतकऱ्यांना कृषीच्या संदर्भात वेगवेगळ्या माहिती दिल्या तर औदुंबर वृक्ष संवर्धन समितीचे दीपक ठाकरे यांनी , आम्ही उमरखेड कसे हिरवेगार केले यासंदर्भात माहिती दिली . या वेळी प्रभारी प्राचार्य डॉ डी एस पवार, वैभव तपाचारी हे उपस्थित होते . सहाव्या दिवशी सकाळी मुंगसाजी महाराज मंदिराचा परिसर स्वच्छ करण्यात आला . दुपारच्या बौद्धिक सत्रात ,बचत गट व लघुउद्योग ‘ यावर मायाबाई मनवर , व्यवस्थापक लोक संचालीत साधन केंद्र , उमरखेड यांनी ,बचत गटाचे महत्त्व सांगून गावकऱ्यांना बचत करणे कसे गरजेचे आहे यावर माहिती दिली . तर शांताबाई इंगळे अध्यक्ष यांनी आपल्या लोकगीतातून बचत गटाचे व लघु उद्योगाचे महत्त्व सांगितले .यावेळेस डॉ .राहुल धुळधुळे, डॉ अनिल काळबांडे हे उपस्थित होते .

सातव्या दिवशी गावातील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले .त्यानंतर संपूर्ण गावाचा विद्यार्थ्यांनी सर्वे केला त्याच बरोबर एच आय व्ही जनजागृती रॅली फलका सह काढण्यात आली . या शिबिराचा समारोप भंते दयानंद महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी पत्रकार दतराव काळे , बाबा खान ,डॉ . डी एस पवार डॉ .जयमाला लाडे ,प्रा .क्रांती मुनेश्वर , डॉ .विश्वास दामोदर डॉ .प्रदीप इंगोले हे उपस्थित होते . यावेळी उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून सौरभ कदम , पायल चव्हाण ,प्रशांत लोमटे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला .या शिबिरा चे आयोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा . ज्योती काळबांडे यांच्यासह अधिक्षक पांडूरग शिंदे, रमेश ढोले ,डॉ अनिल काळबांडे सह महाविद्यालयाची माजी विद्यार्थी अक्षय कदम ,सौरव कदम, गटप्रमुख सौरभ कदम, पायल चव्हाण , रागीनी लोखंडे यांनी परिश्रम घेतले . ( सोबत फोटो )