हिवरा संगम येथील ते उपद्रवी माकड अखेर जेरबंद:वनविभागाच्या रेस्क्यू टीमला यश!

87

✒️तालुका प्रतिनिधी(किशोर राऊत)

महागाव(दि.12मार्च):-तालुक्यातील हिवरा संगम येथे वानेर टोळी सोबतच दोन माकडाने फार उच्छाद घातला होता त्यातील एक माकड तर घरात सुद्धा उतरत होते रोज या घरावरून त्या घरावर धिंगाणा घालने नागरिकांच्या अंगावर धावून जाणे त्यामुळे हिरावासी त्रस्त झाले होते याबाबत गुंज वनपरिक्षेत्राचे संतोष बदुकुले वन कर्मचारी मनीषा मुसळे यांना वारंवार गावकऱ्या तर्फे माहिती देण्यात आली.

वनपरिक्षेत्र अधिकारी यांना माहिती मिळाल्यानंतर रेस्क्यू टीमने दि. १० मार्चला हिवरा संगम येथे उच्छाद घालणाऱ्या त्या उपद्रवी माकडाला जेरबंद केले मकरंद गुजर उपवन संरक्षक, श्याम जोशी कोब्रा एडवेंचर ग्रुप हेड, रॅपिड रेस्क्यू टीम पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली कुणाल निमकर (आर.एफ.ओ) शार्प शूटर मुखबीर शेख, शिवराज बिडकर, अनिल इंगोले, शिरीष डांगे, अश्विन राठोड, वाहक सुनील गिरी, कोब्रा एडवेंचर ग्रुप सदस्य किरण सातपुते, प्रीतम कांबळे, श्रीकांत डोरले,काळी दौलत वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण राऊत (आर.एफ.ओ) संतोष बद्दुकले क्षेत्र सहाय्यक गुंज. वन कर्मचारी मनीषा मुसळे, रोजंदारी वन कर्मचारी सुधाकर देशमुख ओमकार फाळके यांनी अथक परिश्रम घेतले संदीप कदम, विशाल कदम, विक्रांत कदम ,नितीन कदम, राजू कदम, विलासराव कदम, तुका पाटील, उपस्थित होते