आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडियासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

47

✒️चिमूर (पुरोगामी न्युज नेटवर्क)

चिमूर(दि.12मार्च): – चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडियासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर चिमूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरात घूसून हल्ला करण्याचा आरोप तक्रारीत आहे. तक्रार सौ. शीतल अस्वमेध उर्फ साईनाथ बुटके यांची आहे. दरम्यान आमदार बंटी भांगडिया यांच्या तक्रारीवरून साईनाथ उर्फ अश्वमेघ तुकाराम बुटके यांच्यावर भांदवी २९४ कलमातंर्गत गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाची परिसरात खमंग चर्चा सुरू आहे. चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्या बाबतीत अश्लील शब्दातंर्गत मजकूर सोशल मीडियावर साईनाथ उर्फ अश्वमेघ तुकाराम बुटके यांनी वायरल केले. परिणामतः आमदार बंटी भांगडियासह त्यांचे शेकडो कार्यकर्ते,साईनाथ बुटके यांच्या मजूकूरावर नाराजी अंतर्गत चिडले व भडकले. दरम्यान काल दिनांक 11 मार्च रोजी सायंकाळी साईनाथ उर्फ अश्वमेघ तुकाराम बुटके यांच्या घरी आमदार बंटी भांगडिया हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गेले. या वेळी साईनाथ बुटके यांच्या चिमूर येथील राहत्या घरी जाऊन त्यांच्यावर व कुटूंबियांवर हल्ला करून मारहाण केली असल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे.

सदर घटनेच्या वेळी शेकडोच्या नागरिकांची गर्दी झाली होती. हा प्रकार घडल्यानंतर साईनाथ बुटके यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून आमदार आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशन चिमूर येथे ठिय्या आंदोलन केले. आमदार बंटी भांगडिया यांनी साईनाथ उर्फ अश्वमेध तुकाराम बुटके याचे विरोधात तर साईनाथ बुटके यांच्या पत्नीने यांनी आमदार व इतरांचे विरोधात पोलीस स्टेशन चिमूर येथे तक्रारी दाखल केल्या व पोलिसांनी पक्षावर गुन्हे नोंद केले. आमदार बंटी भांगडिया यांच्या तक्रारीवरून साईनाथ बुटके यांच्यावर अश्लील शिवीगाळ करणे संबंधाने संगणकीय प्राताधिकार भंग गुन्ह्याबरोबर भांदवी २९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तर अतात्विक गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक गोळा करून घरात घुसून हल्ला करणे संबंधाने आमदार बंटी उर्फ किर्तीकुमार भांगडिया यांच्यासह बब्बू खान , अमित जुमडे, निखिल भुते , गोलू भरडकर , आशिष झीरे , लल्ला असावा व अनेक कार्यकर्त्यांवर भादवी कलम १४३, १४७, १४९, ४५२, ३२३, ३५४, २९४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र,एकमेकांवर गुन्हा दाखल करण्यासंबंधाचा राडा रात्रो २ ते ३ वाजता पर्यंत चालला. या राडा व हल्ला प्रकरणामुळे चिमूर वासियात भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले होते. चिमूरवासीय रात्रोच्या घटनाक्रमाकडे बारीक नजर ठेवून आहेत. चिमूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी आशिष नोपाणी, ठाणेदार मनोज गभणे सदर घटनाक्रमातंर्गत बारकाईने लक्ष केंद्रित करून चौकशी करीत आहेत. आमदार बंटी भांगडिया हे भाजपा पक्षाचे आहेत तर साईनाथ बुटके यांचा कुठल्याही पक्षासोबत संबंध नाही.

मात्र त्यांचे भाऊ गजानन बुटके हे काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस असून माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. तद्वतच ते माजी कॅबिनेट मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक आहेत.

▪️ पद व सत्तेचा वापर हल्ला करण्यासाठी होऊ नये-गजानन बुटके 

आमदार भांगाडीया व यांच्या कार्यकर्त्यांनी माझे लहान भाऊ साईनाथ बुटके व कुटूंबियांना घरात येऊन मारहाण करणे ही सत्ता व पदाचा गैरवापर आहे, साईनाथ याचे सोशल मीडियावरील मजकुराबाबत आमदार हे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करू शकले असते, झालेला प्रकार हा निंदनीय असून कायदा आम्हाला न्याय मिळवून देईल, असे मत कांग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान आमदार भांगाडीया म्हणाले,सदर प्रकरणाची चौकशी सुरू आहे.चौकशीअंती सत्य पुढे येईल. सध्या या विषयावर अधिकचे बोलणे संयुक्तिक वाटत नाही, या पूर्वी सुध्दा साईनाथ बुटके यांनी आपत्तीजनक मजकूर सोशल मीडियावर प्रसारित केले असल्याचे त्यांनी पत्रकारांशी चर्चा करताना सांगितले,