विश्वदिप महाबोधी विहारात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्मृतीदिन संपन्न

35

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.13मार्च):-शहरालगत असलेल्या श्रीरामपुर येथील विश्वदिप महाबोधी विहारात क्रांतीज्योती सावित्रीबाई यांचा स्मृतीदिन व जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी से. नि.तहसिलदार के.के.दिघाडे,प्रमुख अतिथी म्हणून से. नि.शिक्षणविस्तार अधिकारी पी.डी.खंदारे,प्रा.आर.पी.गवई उपस्थित होते.

सुरवातीला प्रमुख अतिथींच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध,डाँ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.सुजाता महिला मंडळाच्या भगिनींनी बुद्धवंदना घेतली.महिला दिनानिमिक्त सुजाता महिला मंडळाच्या भगिनींचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रमुख अतिथी पी.डी.खंदारे,आर.पी.गवई,आळणेताई ईत्यादींनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर सखोल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम चौरे यांनी तर आभारप्रदर्शन प्रकाशराव आळणे यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वी करण्याकरीता बुद्धविहार समितीचे सर्व कार्यकर्ते यांनी अथक परीश्रम घेतले.