म्हाळसजवळ्यात राडा; शिवसेना जिल्हाप्रमुखांसह ३१ जणांविरोधात गुन्हा

41

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.14मार्च):-तालुक्यातील म्हाळसजवळा येथे सोमवारी रात्री दोन गट समोरासमोर भिडले. यात काठ्या, धारदार शस्त्रे हाती घेऊन एकमेकांना मारहाण करण्यात आली. असे असले तरी दोन्ही गटाकडील लोकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही. परंतू गावात शांतता भंग केल्याप्रकरणी पोलिसांनीच फिर्यादी होत ३१ जणांविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

यामध्ये यामध्ये जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, गणेश खांडे, बाळासाहेब खांडे, पप्पू शिंदे, ज्ञानेश्वर खांडे, सुशिल खांडे, संदीप खांडे, भागवत खांडे यांचाही समावेश आहे. दरम्यान, मारहाणीचा एक कथीत व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

दोन्ही गटाकडून तक्रार आली नसल्याचे पिंपळनेरचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास भारती यांनी सांगितले तर जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे म्हणाले, गावात किरकोळ कारणावरून वाद होत असल्याचे समजले. गावचा प्रमुख या नात्याने माझे जाणे कर्तव्य आहे. मी उलट भांडणे सोडवायला गेलो होतो. मी जर तिथे हजर नसतो, तर काही तरी अनर्थ घडला असता, असे सांगितले.