उमरखेड येथे धुमधडाक्यात साजरी होणार भीम जयंती

97

🔸भीम जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रफुल दिवेकर तर उपाध्यक्षपदी शुद्धोधन दिवेकर आणि कोषाध्यक्षपदी सिद्धार्थ दिवेकर यांची सर्वानुमते निवड

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.14 मार्च):- शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वार्डमधील सम्यक बुद्ध विहारांमध्ये 132 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठित करण्याकरिता मीटिंग चे आयोजन करण्यात आले होते.

या मिटिंग चे अध्यक्ष म्हणून भंते कीर्ती बोधी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कुमार केंद्रेकर (अध्यक्ष शांतीदूत समिती) हे होते.

सुरुवातीला विश्वाला शांतता संदेश देणारे महाकारूणीत थागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटने शिल्पकार भारतरत्न महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मिटिंगची सुरुवात करण्यात आली.

प्रमुख पाहुणे कुमार केंद्रेकर यांनी येऊ घातलेल्या 14 एप्रिल म्हणजेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त अमूल्य मार्गदर्शन करून आपले मनोगत व्यक्त केले.

तर या मिटींगचे अध्यक्ष भंते किर्ती बोधी यांनी भीम जयंती समितीच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मंगलमय शुभेच्छा दिल्यात.

132 वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रफुल दिवेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

तर उपाध्यक्षपदी शुद्धोधन दिवेकर, सचिव पदी आकाश श्रवले, कोषाध्यक्षपदी सिद्धार्थ दिवेकर, अंकुश दिवेकर, संघटकपदी अमोल दिवेकर, ऋषिकेश पाईकराव तर कार्याध्यक्षपदी आकाश आठवले यांची निवड उपस्थित सर्वांच्या वतीने करण्यात आली.

तसेच भीम जयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

चौकट :- “यावर्षी धुमधडाक्यात साजरी होणार भीम जयंती”…!

यावेळी शांताबाई दिवेकर, जिजाबाई दिवेकर, सुभद्राबाई पाईकराव,भारताबाई दिवेकर,उषाताई इंगोले, यशोदाबाई दिवेकर, मारुती दिवेकर, संतोष इंगोले असे अनेक बौद्ध उपासक उपासिका तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.