सातवे तालुका पन्हाळा येथे अवनी महिला प्रभाग संघाचा महिला मेळावा व वर्धापन दिन संपन्न

35

✒️इकबाल पीरजादे(प्रतिनिधी विशेष)

इस्लामपूर(दि.19″मार्च):- सातवे तालुका पन्हाळा येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व अवनी महिला प्रभाग संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आणि महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून अवनी प्रभाग संघाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित संयुक्त कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच परिषदेच्या महिला आघाडीच्या राज्याध्यक्ष सौ राणी पाटील यावेळी उपस्थित होत्या.

तसेच यावेळी सरपंच अमर दाभाडे व सावर्डे गावचे सरपंच बाळासाहेब पाटील तसेच प्रभाग समन्वयक तेजस्विनी शिंदे हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे निमंत्रक सव्वा अश्विनी इंगवले सौ ज्योती चौगुले आणि सौ कल्पना चिले यांच्या नेतृत्वाने या कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले यावेळी समाजातील प्रभागातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान वृक्षाचे रोप देऊन करण्यात आले. यावेळी राणी पाटील यांनी समाजातील स्त्रियांचे वर्तमान स्थान काय आहे आणि कोणत्या बाबीवर स्त्रियांनी लक्ष केंद्रित करावे समाजकारण आणि राजकारणात स्त्री सक्षम कशा पद्धतीने होईल याविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले यावेळी राणी पाटील यांचाही सत्कार सरपंचांच्या हस्ते करण्यात आला