राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या रणरागिणी नी सामान्य माणसांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सरकारला सळोकी पळो करून सोडावे: बाळासाहेब पाटील

30

✒️विशेष प्रतिनिधी(इकबाल पीरज़ादे)

इस्लामपूर(दि.21मार्च):-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रणरागिनींनी सामान्य माणसाच्या प्रश्नावर सरकारला सळो की पळो करून सोडावे,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील यांनी इस्लामपूर येथे केले. लोकनेते राजारामबापू पाटील,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी सत्ता असो वा नसो त्यांनी कायम सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्याच्या हितासाठी संघर्ष केला असल्या चेही त्यांनी सांगितले.

इस्लामपूर येथे राष्ट्रवादी भवनमध्ये वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकी मध्ये ते बोलत होते. तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने अध्यक्षस्थानी होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, राजारामबापू साखर कारखान्याच्या संचालिका मेघा पाटील,प्रा.डॉ.योजना शिंदे- पाटील उपाध्यक्षा वैशाली पाटील,सायली गोंदील,जयश्री पवार,कल्पना कोळेकर प्रामुख्याने उपस्थित होते.विजयराव पाटील म्हणाले,लोकनेते राजारामबापू पाटील,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी कायम संघटनेस महत्व दिलेले आहे. त्यांनी संघटनेत प्रभावी काम करणाऱ्या कार्यकर्त्यास नव-नव्या संधी दिलेल्या आहेत. महिलांनी आपले संघटन अधिक मजबूत करून महिलांच्या प्रश्नांवर आंदोलन करावे.जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव म्हणाल्या आपल्या वाळवा तालुक्यातील संघटनेस एक परंपरा व वारसा आहे. तो वारसा समर्थपणे पुढे नेण्याची जबाबदारी आपणास पार पाडावी लागेल.

यावेळी केतकी शिंदे यांनी महिलांना आरोग्याची काय काळजी घ्यायची याबद्दल माहिती दिली. तसेच सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यशाळेसाठी इच्छुक महिलांची नांवे घेण्यात आली.यावेळी ‘राजारामबापू’चे नूतन उपाध्यक्ष विजयराव पाटील, संचालिका मेघा पाटील प्रा.डॉ.योजना शिंदे-पाटील हुबालवाडीच्या उपसरपंच रेखा पवार,ढवळी ग्रामपंचायत सदस्या चारुलता पाटील,सुरुल ग्रामपंचायत सदस्या ज्योती पाटील,तसेच अरुंधती पाटील (तांदुळवाडी),कल्पना कोळेकर (रेठरे हरणाक्ष) यांच्या सत्कार करण्यात आला.

प्रारंभी तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना संघटनेच्या कामाचा आढावा मांडला. स्मिता गायकवाड, लता पाटील,विद्या भानुसे, सरिता पाटील, सुषमा कांबळे,सविता पाटील,सुजाता पाटील, वैशाली निकम,रुपाली ठोकळे, मिना पाटील यांच्यासह महिला उपस्थित होत्या. उपाध्यक्षा वैशाली पाटील यांनी आभार मानले.

फोटो ओळी- इस्लामपूर येथे उपसरपंच रेखा पवार यांचा सत्कार करताना बाळासाहेब पाटील. समवेत विजयराव पाटील,सुनिता देशमाने,सुस्मिता जाधव,मेघा पाटील,योजना शिंदे-पाटील, वैशाली पवार,चारूलता पाटील, ज्योती पाटील, सायली गोंदील, जयश्री पवार,व महिला.