बदली प्रक्रियेतील सहाव्या टप्प्यात झालेला अन्याय त्वरित दूर करावा

31

🔸विविध मागण्यांसाठी पुरोगामी शिक्षक समितीची सी. ई. ओ.सोबत सकारात्मक चर्चा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.31मार्च):- जिल्हा परिषद चंद्रपूर चे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक जानसन यांनी प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी महा. पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीची बैठक आयोजित केली होती. बैठकीला शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, पुरोगामीचे राज्यनेते विजय भोगेकर, राज्यसरचिटणीस हरीश ससनकर, जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार, जिल्हा कोषध्यक्ष सुनिल कोहपरे, जिल्हा उपाध्यक्ष रवि सोयाम, जिल्हा कार्यालयीन सचिव सुरेश गिलोरकर, देवेंद्र गिरडकर यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत सन 2022 च्या शिक्षक संवर्गाच्या बदल्यातील सहाव्या टप्यात झालेल्या बदल्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. बदल्यांच्या सहाव्या टप्प्यात ज्युनिअर शिक्षकांची नावे बदलीपात्र यादीत आल्याने त्यांच्यावर अन्याय झालेला असून सिनिअर शिक्षकांची नावे प्रशासनाने चुकीची माहिती नोंदविल्याने बदलीपात्र यादीत आलेली नाही. अवघड क्षेत्रातील रिक्त् पदे भरतांना सेवा ज्युनिअर शिक्षकांऐवजी सिनीअर शिक्षकांची ऑनलाईन बदली झालेली आहे. त्यामुळे संबंधितांवर अन्याय झालेला आहे. त्यासाठी बदलीचा सहावा टप्पा रदद करण्यात यावा किंवा चुकीची दुरुस्ती करुन पुन्हा संधी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.या संदर्भात मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक जानसन सदर प्रकरणाची चौकशी करुन त्यासंबंधीचा अहवाल आयुष प्रसाद अध्यक्ष बदली अभ्यासगट यांचेकडे पाठविणार आहेत.

तसेच प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. विस्तार अधिकारी शिक्षण, केंद्रप्रमुख, उच्च् श्रेणी मुख्याध्यापक, विषय शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया त्वरीत राबविण्यात यावी, इतर जि.प.मध्ये सदर पदांची पदोन्नती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. शिक्षक संवर्गाची सेवाजेष्ठता यादी प्रकाशित करण्यात यावी. दरवर्षी जानेवारी महिन्यात सेवाजेष्ठता यादी प्रकाशित करण्यासंदर्भात शासन निर्देश आहेत. जिल्हा पुरस्कार प्राप्त् शिक्षकांच्या वेतनवाढीचा प्रश्र त्वरीत निकाली काढण्यात यावा. वैद्यकीय प्रतिपुर्ती देयक शिक्षण विभागातून आरोग्य व वित्त् विभागात पाठविण्यास होत असलेल्या विलंबाबत, सेवेत असणारे व सेवानिवृत्त् झालेल्या शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता व गटविमा रक्क्म त्वरीत देण्यात यावा, गंभीर आजारासाठी सुटटया मंजुर असुनही दोन वर्षापासून न मिळालेले वेतन त्वरीत अदा करणेबाबत, नक्षलग्रस्तक्षेत्रात कार्यरत असेपयंत संबंधित शिक्षकांना एकस्तरचा लाभ मिळणेबाबत. मा. उच्च् न्यायालयाचे निर्णय) ,मुळ सेवापुस्तकांची पडताळणीसाठी शिबीराचे आयोजन करणे, शैक्षणिक अर्हता वाढीचे मंजुरीचे अधिकार गटविकास अधिकारी यांना प्रदान करणे, सेवानिवृत्त् शिक्षकांचे जी. पी. एफ/ गटविमा चे रक्क्म त्वरीत अदा करणेबाबत, पंचायत समितीला ऑफलाईन निधी उपलब्ध करुन देण्यात यावे.

सेवानिवृत्तीचे वेळी वसुल केलेली जिल्हा पुरस्कार वेतनवाढीची रक्क्म परत देणेबाबत, श्री.पुष्पांकर श्रीहरी बांगरे से.नि.शिक्षक पं. स. ब्रम्हपुरी यांची वसुल केलेली रक्कम रु.2,66,539/- परत करण्यात यावी. 1 जुलै 2022 चे परिपत्रक ग्रामविकास विभाग, प्राथमिक शिक्षक,पदवीधर शिक्षक, उच्च् श्रेणी मुख्याध्यापक यांचे वरिष्ठश्रेणीचे प्रस्ताव मंजुर करण्यात यावे यासह अनेक मागण्यांचे निवेदन, मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांनी देण्यात आले असून सदर संबंधाने लवकरच सभा आयोजित करण्यात येईल असे प्रशासनाचे वतीने आश्वासन दिले आहे असे जिल्हा प्रसिध्दीप्रमुख लक्ष्मण खोब्रागडे यांनी कळविले आहे..