अवैध रेती उपसा व मुरूम उत्खनन करणाऱ्यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करा.. – गजानन बुटके यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन

194

 

✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर

चिमूर तालुक्यात नदी पात्रातील मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा व मुरूम उत्खनन सुरू असून सदर प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषिवर तात्काळ कारवाई करण्याबाबत जिल्हा नियोजन समिती सदस्य गजानन बुटके यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी चिमूर याना निवेदन देण्यात आले.
मागील अनेक वर्षांपासून शासनाने चिमूर तालुक्यात रेती घाट लिलाव न केल्याने सोनेगाव. उसेगाव. गोंदोडा. वाघेडा. शिरपूर. मोठेगाव. गोरवट. चिमूर व जंगल व जंगल परिसरातील नदी नाले घाट येथून सरासपने जेसीबी. पोकल्यांड लाऊन 24 तास ट्रक व ट्रॅक्टरच्या माध्यमातून अवैध उपसा केल्या जात असल्याने शासनाचा संपूर्ण महसूल बुडत असल्याने शासन महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तेवढ्याच मोठ्या प्रमाणात मुरुमाचे सुधा अवैध उत्खनन केल्या जात आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोशिवर कार्यवाही करणाकरिता माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य गजानन बुटके यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी चिमूर याना निवेदन देण्यात आले
निवेदन देतेवेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य गजानन बुटके. कृषी उत्तपंन बाजार समिती सदस्य भरत बंडे. प्रा. राजू दांडेकर. सुधीर जुंमडे. रेहान शेख. विजय शेंडे. रामदास विठाले. व अन्य काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते