श्री मनोज भुपाल यांची भाजपा ओबीसी आघाडीच्या चंद्रपूर जिल्हा महामंत्री पदी तसेच तालुका महामंत्री पदी सुभाष नाकतोडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव

34

🔹प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कार्याच्या सन्मान-
प्रा.अतुल देशकर, माजी आमदार ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपूरी(दि. 3 एप्रिल):-नुकतीच नागपूर येथे ओबीसी आघाडीची पूर्व विदर्भाच्या बैठक पार पडली. या बैठकीत विदर्भ संपर्क प्रमुख रविंद्रजी चौव्हान यांचे प्रमुख उपस्थितीत ओबीसी आघाडीचे राष्ट्रीय महामंत्री मा. खासदार संगमलालजी गुप्ता यांनी चंद्रपूर जिल्हा महामंत्री म्हणून श्री मनोज भूपाल यांची घोषणा केली. आणि ओबीसी समाजाला जणु आनंदाचे उधाण आले. मनोज भुपाल हे उच्चविद्याविभूषित असून,शांत संयमी आणि मनमिळावू स्वभावामुळे ते तालुकयातच नव्हे तर जिल्ह्यात सुपरिचित आहेत.त्यांच्या सततच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन त्याना जिल्हा महामंत्री पदाची जबाबदारी देऊन त्यांचे कार्य विस्तारले.

या बैठकीत प्रदेशाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, महामंत्री असे अनेक पदाधिकांऱ्यासमवेत प्रा.प्रकाशजी बगमारे प्रदेश कार्यकारणी सदस्य ओबीसी आघाडी, अविनाश पाल जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी आघाडी,डॉ.अशोक सालोटकर. प्रा. जुमडे सर उपस्थित होते.ब्रम्हपूरी विधानसभेचे माजी आमदार आदरणीय प्रा.अतुल देशकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.गोकुल बालपांडे, तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, जिल्हा महामंत्री क्रिष्णा सहारे, भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रा.रामलाल महादेव दोनाडकर, ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष प्रेमलाल धोटे, जिल्हा सचिव माणिक पाटील थेरकर, आदिवासी आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेश्वर मगरे, भाजयुमो महामंत्री प्रा.यशवंत आंबोरकर, जिल्हा सदस्य द्यानेश्वरजी भोयर, सुरेखा ताई बालपांडे, सदाशिव ठाकरे उपसरपंच,लोमेशमेश्राम,सौ.मालन पुंडलिक बुध्दे यांचेसह सर्व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.