अक्षर आनंद बाल वाचक सन्मान सोहळा संपन्न

29

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.3एप्रिल):-कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गंगाखेड येथे अक्षर आनंद बाल वाचक संस्कार केंद्र व गट साधन केंद्र गंगाखेड यांच्या संयुक्त विद्यमाने अक्षर आनंद उत्कृष्ट बाल वाचक स्पर्धेतील विजेत्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.

सदर कार्यक्रमास अक्षरआनंद बाल वाचन संस्कार केंद्राचे सर्वेसर्वा विनोद शेंडगे, कन्या गंगाखेड केंद्राचे केंद्रप्रमुख श्री शिवाजी फड सर, लॉयन्स क्लब गोविंद रोडे सर, अतुल गंजेवार,विषय साधनव्यक्ती रविकिरण सालमोटे, मुख्याध्यापक श्रीमती अर्जुने मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.विजेत्या स्पर्धकांना अक्षर आनंद बाल वाचन संस्कार केंद्राचे विनोद शेंडगे यांच्या वतीने सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पहार देऊन विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षक यांच्या सह सन्मानित करण्यात आले.

श्रीमती इंदुमती कदम मॅडम यांना त्यांच्या विज्ञानाची सफर या पुस्तकाची विद्यार्थांसाठी ठरलेली*उपयुक्तता यासाठी सन्मानित करण्यात आले. प्रसंगी श्री.विनोद शेंडगे सर,श्री गोविंद रोडे सर यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.

तर विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकश्रीमती जोशी मॅडम,अर्जुने मॅडम,औताडे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे *प्रास्ताविक श्री रविकिरण सालमोटे (विषय साधनव्यक्ती)यांनी केले.तर श्रीमती इंदुमती कदम मॅडम यांनी आपल्या ओघवत्या व बहारदार सूत्र संचलनाने कार्यक्रमात रंगत आणली