राजस्थान, नारेहडा येथे सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे उपस्थी मध्ये प्रथमच महात्मा फुले जयंती सोहळा संपन्न

43

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

🔸सैनी समाजाच्या प्रतिभा सन्मान सोहळ्याचे 196 वी फुले जयंती  निमित्त शानदार आयोजन

म्हसवड(दि.9एप्रिल):- नरेहडा सैनी समाजातर्फे महात्मा जोतीराव फुले 196 वी जयंती व प्रतिभा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात प्रथमच दि.9 एप्रिल 2023 रोजी विवेकानंद आदर्श विद्यालय प्रांगणात दिमाखात संपन्न झाला. यामध्ये प्रमुख पाहुणे संत शिरोमणी 1008 मंगलदास महाराज तोरडा गुजर धाम संत शिरोमणी 1008 मोहनदास महाराज नील का धाम ,अध्यक्ष श्रीनाथ पाटील, श्रीकृष्ण धाम, श्रीकृष्ण धाम, आणि फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन ,पुणे चे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांच्या प्रमुख उपस्थिती हा सोहळा संपन्न झाला. विशेष अतिथी पुष्पा सैनी अध्यक्ष नगर परिषद कोटपुतली, राकेश सैनी अध्यक्ष कोटपुतली नांगराम सैनी सैनी सभा अध्यक्ष नरेहाडा उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थी व कर्मचारी तसेच 80 वर्षांवरील स्त्री- पुरुषांचा फेटा व महात्मा जोती सावित्री यांची फोटो फ्रेम व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी सत्यशोधक ढोक म्हणाले की फुले दाम्पत्यानी 175 वर्षापूर्वी सामाजिक , शैशणिक महान कार्य केले असून सत्यशोधक समाकाची स्थापना केली त्याला 150 वर्ष पूर्ण होत असून आपण सर्वांनी अंधश्रध्दा ,कर्मकांड याला तिलांजली देत सत्यशोधक पद्धतीने सामुदायिक विवाह लावण्यासाठी पुढाकार घ्यावा त्यासाठी आमची फुले एज्युकेशन संस्था पूर्ण मदत करेल.या पूर्वी तेलगणा राज्यात 3 सत्यशोधक विवाह लावले असून राजस्थान मद्ये लावण्याची ईच्या असून आपण मदत करावी तसेच आमचे सावित्रीबाई फुले हिंदी पुस्तक देखील प्रकाशित करावे म्हंटले.

या कार्यक्रमात नरेहाडा येथील सर्व समाज बांधव सहभागी झाले होते तसेच कोटपुतली व गावातील सैनी समाजाचे पदाधिकारी व इतर मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. विशंबर सैनी, जयराम, रामस्वरूप, अर्जुन लाल, गणपत, किशन लाल, बनवारी लाल, जयप्रकाश, माखन, अमरसिंग मनोहर लाल, मंगल राम, दुर्गाप्रसाद, हनुमान, महेंद्र सैनी माजी अध्यक्ष, कन्हैया लाल ब्लॉक अध्यक्ष, खयालीराम कर्मचारी संघाचे अध्यक्ष, बिद्दी चंद सैनी, प्रल्हाद सैनी विधानसभा अध्यक्ष दंतिल लीलाराम, विनोद सरुड रामसिंग सैनी, योगेश सैनी, प्रकाश तोडवाल, बिल्लुराम सैनी यांच्यासह सर्व सैनी समाजाचे लोक उपस्थित होते.