समतावादी समाज निर्माण होण्यासाठी एकत्र येऊया : प्रा. शहाजी कांबळे

78

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.11एप्रिल):- जात, धर्म, वंशभेद याचा प्रभाव वाढण्याच्या काळामध्ये, माणसा माणसांमध्ये भेद करून राजकारण करणाऱ्यांना रोखण्यासाठी व समतावादी समाज निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे असे प्रतिपादन प्रा शहाजी कांबळे यांनी केली.अध्यक्षस्थानी माजी आमदार राजीव आवळे होते.यावेळी प्रा. शहाजी कांबळे यांना या वर्षीचा मानाचा, सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा समता जीवन गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त… निर्मिती विचारमंच, कोल्हापूर आणि संविधान जनजागृती अभियान यांच्या वतीने राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर या ठिकाणी होत असलेल्या आठ दिवसाच्या कला, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक चळवळींना गतिमान करण्यासाठी प्रबोधनाची भूमिका पार पडणाऱ्या समता महोत्सवाचे उदघाटन भारतीय संविधानाची प्रास्ताविका वाचून करण्यात आले.

यावेळी प्रा. डॉ. श्रीपाद देसाई, डॉ. अनुप्रिया गावडे, राधेशाम जाधव, बाळू बोडके, अशोक पाचकुडवे, मोनिका तारमळे, विभावरी मेश्राम, डॉ. संदीप गायकवाड, शंकर अंदानी, सुरेश हिवराळे, तुळशीराम जाधव, ॲड. दशरथ बनसोडे, भीमराव भवरे, अशोक कांबळे, ॲड. शुभांगी भालेराव, डॉ. सविता व्हटकर, सुधारक तुपे, छाया पाटील, शंकर पुजारी, डॉ. ऐश्वर्या कराळे, रवींद्र श्रावस्ती, डॉ. प्रभाकर पवार, डॉ. अस्मिता प्रधान, सुहास पवार, डॉ. बी. के. कांबळे, भालचंद्र गोरेगांवकर, उत्तम रेडेकर, रविंद्र देवरे, चंद्रकांत सावंत, राजाराम काशीद, डॉ. मीरा देठे या मान्यवरांचा राष्ट्रीय संविधान सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.सदर कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विजया कांबळे, डॉ. नंदकुमार गोंधळी, अ‍ॅड. करुणा विमल, संदिपदादा ठोंबरे, प्रा. अमोल महापुरे, निती उराडे, लेखिका व प्रकाशिका डॉ. शोभा चाळके, किशोर खोबरे, अनिरुद्ध कांबळे, डॉ. निकिता खोबरे, रुपेश कुसुरकर यांच्यासह संविधान प्रेमी लोकमोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक अनिल म्हमाने यांनी केले, आभार अरहंत मिणचेकर तर सूत्रसंचालन स्वप्निल गोरंबेकर यांनी केले.