म्हसवड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

31

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.13एप्रिल):-देशात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्याचप्रमाने म्हसवड शहरात सुद्धा जयंती मोठ्या प्रमात साजरी होणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आकाश सरतापे यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती 13 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 अखेर साजरी होणार असून 13 एप्रिल रोजी जयंतीनिमित्त भोजनदाना चा कार्यक्रम आहे 14 एप्रिल 2023 जयंती दिवशी सकाळी नऊ वाजतां डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांच्या प्रतिमाना अभिवादन केले जाणार असून सामुदाईक त्रिशरण, पंचशील आणि लहान मुलांची भाषणे होणार आहेत सायंकाळी सहा वाजतां भव्य मिरवणूक निघणार असून त्यामध्ये तथागत गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर याचे मूर्ती सजविलेल्या रथातून व चित्ररथाची शोभायात्रा निघणार आहे.

15 एप्रिल 2023 रोजी सुमधुर भीमगीतांचा कार्यक्रम असून 16 एप्रिल रविवार रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून रक्तदात्यास यावेळी भेटवस्तु दिली जाणार आहे त्याचप्रमाने 17 एप्रिल रोजी होममिनिस्टर कार्यकम आयोजित केला असून विजेत्यास “रमाई पैठणी” दिली जाणार आहे.मंगळवार दि.18 एप्रिल सायंकाळी सात वाजतां महात्मा फुले चौक येथे फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेवर विचारवन्त युथ आयकोन प्रा.रोहित देशमुख यांचे व्याख्यान तर 20 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रवर दोन गटात वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन केले आहे.शुक्रवार दि.20 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी सात वाजतां म्हसवड नगरपरिषदेसमोर “भारतीय संविधान”या विषयावर महाराष्ट्रातील आघाडीच्या वक्त्या, फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेच्या गाढा अभ्यासक सुषमाताई अंधारे यांच्या व्याख्यांनाचे आयोजन करणेत आले आहे.

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशात तर मोठ्या प्रमानात साजरी केली जातेच पण सालाबाद प्रमाणे याही वर्षी म्हसवड शहरात जयंती उत्सव मोठ्या प्रमाण साजरा केला जाणार आहे तरी म्हसवड शहरासह पंचक्रोशीतील सर्व जनतेने या महामहोत्सवात सामील होण्याचे आवाहन जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आकाश सरतापे यांनी केले आहे.