दहावे ‘रमाई चळवळी’चे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दिशा पिंकी शेख यांची निवड

32

✒️प्रा.भारत शिरसाट(विशेष प्रतिनिधी,छत्रपती संभाजीनगर)मो:-९४२१३०८१०१

छत्रपती संभाजीनगर(दि.24एप्रिल):- रमाई फाउंडेशन,मासिक रमाई आणि सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीनगरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहावे ‘रमाई’ चळवळीचे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवयित्री तथा नाट्य लेखिका दिशा पिंकी शेख यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती रमाई फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा रमाई मासिकाच्या संपादक डॉ. रेखा मेश्राम यांनी दिली आहे.

दहावे रमाई चळवळीचे साहित्य संमेलन दि. २७ मे २०२३ रोजी (रमाई स्मृतिदिनी) अहमदनगर येथे होणार आहे. दिशा पिंकी शेख या तृतीयपंथी समूहाच्या प्रतिनिधी म्हणुन कार्यरत आहेत. त्या प्रसिद्ध कवयित्री, नाट्यलेखिका, स्तंभ लेखिका असून त्यांचा ‘कुरूप’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. दिशा पिंकी शेख यांनी 2017 मध्ये दैनिक दिव्य मराठीमध्ये ‘उबळ’ नावाचा कॉलम वर्षभर लिहिला होता. तृतीयपंथी समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात 2018 मध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश घेतला असून एखाद्या राजकीय पक्षाच्या राज्य कार्यकारणीवर निवड झालेल्या दिशा पिंकी शेख या पहिल्या तृतीयपंथी आहेत.

या निवडीबद्दल त्यांचे दैवशील गवंदे, ललिता खडसे, शोभा खाडे, बेबीनंदा पवार, सुलभाश्री सिरसाट, कल्पना वाहुळे, शारदा गजभिये, जयश्री सरोदे, गंगाबाई सुरडकर, रत्नकला बनसोड, राजकन्या गोंडाने, मंगल मून, डॉ. प्रज्ञा साळवे, डॉ.श्यामल गरुड, डॉ.विजया चक्रनारायण, सुनंदा नागदिवे, डॉ.वंदना पाटील, सुनंदा जाधव, डॉ.ललिता गोपाळ, अनुमती तिडके, दीक्षा मेश्राम, नेहा सिरसाट आदींसह रमाई फाउंडेशन,/रमाई मासिकाच्या वतीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.