महाबोधी महाविहार बौध्दगया येथे आयोजीत कार्यक्रमात माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकरांनी केले मार्गदर्शन

28

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमुर प्रतिनिधी)

चिमूर(दि.8मे):-महाबोधी महाविहार बोधीवृक्ष परिसर बौध्दगया येथे महाबोधी चॅरिटेबल ट्रस्ट, डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल बुध्दीस्ट संसद व इंटरनॅशनल बुध्दीस्ट नेटवर्क यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत बुध्दजयंती कार्यक्रमात महाराष्ट्र खनिकर्म महामंडळाचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे प्रदेश महासचिव तथा चिमुर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर हे मार्गदर्शक म्हणुन उपस्थित होते.

महाबोधी चॅरिटेबल ट्रस्ट, डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल बुध्दीस्ट संसद व इंटरनॅशनल बुध्दीस्ट नेटवर्क यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत बुध्दजयंती कार्यक्रमात सुमारे एक हजार भिक्खु संघांना धम्मदान कार्यक्रमात मंचावर बिहारचे माजी मुख्यमंत्री जितेंद्र मांझी, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव प्रा. डॉ. पुरणचंद्र मेश्राम, बहुजन भारत मुक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम, डॉ. आर. बी. एस. पुष्करजी, डॉ. अरविंद सिंह, प्रा. डॉ. युवराज मेश्राम, डॉ. जी. एस. गौतम, श्योराज सिंहजी, भैय्याजी खैरकर, बोधगया महाविहार राष्ट्रीय अध्यक्ष भदंत हर्षबोधी महास्थवीर आदी मान्यवर उपस्थित होते