पत्रकारांनी अन्यायाच्या विरोधात मुक्ता साळवे यांच्या वैचारीक्तेतून आपली लेखणी चालवावी-विलासराव जंगले

33

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.8मे):-आपल्या भारत देशात आजच्या पत्रकारांनी जनतेच्या भल्यासाठी पिढीत जनतेच्या भावना, समस्या, प्रश्न आपल्या वर्तमान पत्रात प्रखरपणे मांडवीत जसे अन्यायाच्या विरोधात १८५४ साली त्यावेळच्या सरकारला मुक्ता साळवे यांनी जाहीर सभेत आपले विचार मांडत असतांना म्हटले होते कि, आम्ही धर्म नसलेली माणसे आहोत, ज्या धर्मात आम्हाला कसलीच किंमत नाही, तो धर्म आमचा कसा असू शकेल. असे परखड मत मांडले होते. आज आपण स्वतंत्र भारतात असून सामान्य माणसाची समस्या, प्रश्न अग्रक्रमाने मुद्दामहून मांडले पाहिजेत. कारण पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्थंभ आहे आणि तो भक्कम असलाच पाहिजे त्यासाठी निष्पक्ष बातम्या प्रसारित करणे हीच काळाची गरज आहे.

मुक्ता न्यूज वर्तमान पत्राच्या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संत जनाबाई महाविध्यालायाचे डॉ. प्रा. एम.डी. इंगोले हे होते तर एम.पी.एस.सी. मार्फत आयकर विभागात S.T.I. पदी नियुक्त झालेले सत्कारमूर्ती दत्ता लहू भालेराव, नगरसेवक चंद्रकांत खंदारे, उस्मान शेख, भीमराव कांबळे, अनिल साळवे, शेख महेमूद, बालासाहेब कदम, गुणवंत कांबळे, पिराजी कांबळे, विकास रोडे, संतोष हनवते यांची उपस्थिती होती. यावेळी मुक्ता न्यूज वर्तमान पंत्राच्या अध्यक्षीय समारोप करत असतांना प्रा. डॉ. इंगोले म्हणाले, लोकशाही वृद्धिंगत करने हे पत्रकारितेचे ध्येय असले पाहिजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता पाहता मूकनायक , बहिषकृत भारत, समता, जनता, प्रबुद्ध भारत अशी वर्तमान पत्रामधून सामान्य माणसाच्या समस्यांना वाचा फोडली. याप्रसंगी मुक्ता न्युज प्रकाशन सोहळा होत असतांनाच एम.पी.एस.सी. मार्फत आयकर विभागात S.T.I. पदी नियुक्त झालेले सत्कारमूर्ती दत्ता लहू भालेराव यांचा पाल्यासह शाल आणि गुच्चे देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहिदास लांडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ हत्तींबिरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल साबणे यांनी केले. प्रकाशन सोहळा यशस्वी करण्यासाठी मुक्ता न्युज वर्तमान पत्राचे मुख्य संपादक अड विलास लांडगे, अड उत्तम काळे, नवनाथ साळवे, अशोक व्हावले, , मनोज मसुरे, संतोष कालींदर, मिलिंद साळवे, सामेज लांडगे, विशाल लांडगे आदींनी परिश्रम घेतले.