साठगाव-रोहणा रस्त्यावर पडले खड्डे,, रस्त्याच्या कामासाठी लावले बेशरमचे झाडे

31

🔹नागरीकांचे एकदिवसीय उपोषण

🔸आंदोलनाला काँगेस व शिवसेनेचा पाठिंबा

✒️प्रतिनिधी चिमूर(बालू सातपुते)

चिमूर(दि.9मे):- तालुक्यातील साठगाव – रोहणा फाट्यापर्यंतच्या आठ किलोमीटर रस्त्याचे काम साडेतीन वर्षापूर्वी मंजूर झाले, मात्र आजत गाजत या रस्त्याचे काम करण्यात आले नाही. हा रस्ता पूर्ण पने उखडला असून त्यावर खड्डे पडले आहेत. जीव मुठीत घेऊन ये जा कराव लागत आहे. त्यामुळे हा रस्ता पावसाळा सुरू होण्यापूर्वी करावा या मागणीसाठी आज दिनांक ८ मे रोजी रस्त्यावर बेश्रमचे झाडे लावून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला काँग्रेस आणि शिवसेना पक्ष ने पाठिंबा दिला आहे.

साठगाव ते रोहनाफात्याचा रस्ता अनेक वर्षापासून उखडला आहे. त्यावर ठीक ठिकाणी खड्डे पडले आहे. त्यामुळे येथून जाता येताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. भिवापूरची मुख्य बाजार पेठ साठगाव पासून फक्त १० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना याच उखडलेल्या रस्त्याने जावे लागत आहे. या रस्त्याच्या बांधकामाची मागणी अनेक वर्षापासूनची आहे. याबाबत कितेकदा निवेदन देण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून ३१ डिसेंबर २०१९ रोजि हायब्रीड यानुटी योजने अंतर्गत आठ किलोमीटरचा रस्ता मंजूर करण्यात आला. कामाचे कंत्राट सुधा देण्यात आले. साडेतीन वर्षाचा कालावधी होऊनही खाद्याच्या रस्त्यावरील जीवाची जोखीम अजून संपली नाही.

सार्वजनिक बांधकाम उपविभाग अभियंता कार्यालयाला कामाला सुरुवात करण्याची अनेकदा तोंडी लेखी विनंती करण्यात आली होती. मात्र त्यांची दखल घेण्यात आली नव्हती.

त्यामुळे एक फेब्रुवारीला एक दिवसीय उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. तेव्हा लवकरच काम करण्याचं आश्वासन बांधकाम विभागाने दिले होते. मात्र पावसाळा येऊनही काम सुरू नाही झाल्यामुळे आज साठगाव ग्रांम पंचायत उप सरपंच प्रीती दीडमुठे यांचे नेतृत्वात गावकऱ्यांच्या सहकार्याने एक दिवसीय उपोषण व रस्त्यावर बेशरमचे झाडे लावण्याचे आंदोलन केले. या आंदोलनाला काँगेस पक्ष्याचे तालुकाध्यक्ष विजय गावंडे, शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यांनी उपोषणाला पाठिंबा दिला आहे.