विसापूर येथे बैलगाडा जंगी शर्यत 11 मे रोजी आयोजन कोण होणार विसापूर नामदार केसरीचा मानकरी

29

✒️सातारा-खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812

सातारा(दि.9मे):- जिल्ह्यातील खटाव तालुका विसापूर येथे दि. 11मे रोजी बैलगाड्यांच्या जंगी शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून या भव्य ओपन मैदान बैलगाडा जंगी शर्यती स्पर्धेमध्ये एक ते सहा नंबर साठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आल्याची माहिती पिंटू साळुंखे यांनी दिली असून या शर्यतिमध्ये भाग घेण्याचे आवाहन केले आहे.

विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा येथे दिनांक 28 एप्रिल रोजी घेण्यात आल्या होत्या. त्या अवकाळी व वादळी पावसामुळे रद्द करण्यात आल्या होत्या याचाच भाग म्हणून 11 मे गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजता माननीय नामदार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये व प्रमुख पाहुणे मा. खासदार छ. उदयनराजे भोसले यांचे उपस्थितीमध्ये होणार आहेत.

सदर या शर्यतीसाठी प्रथम क्रमांकासाठी 1लाख रुपये, द्वितीय 51 हजार रुपये, तृतीय 25 हजार रुपये, पंधरा हजार, दहा हजार, पाच हजार,रुपये अशी राहणार आहेत.प्रवेश फी पंधराशे रुपये राहील,स्पर्धा शासनाच्या नियमाप्रमाणे घेतल्या जातील,अकरानंतर येण्याऱ्या स्पर्धकांच्या गाडी नोंद केल्या जाणार नाही.

अपघातास आयोजक,संयोजक जबाबदार राहणार नाहीत स्पर्धेत पंचांचा निर्णय अंतिम राहील.सर्व गटातील गाडयांचा निकाल पारदर्शकरित्या स्क्रीनवर पाहून दिला जाईल. बैलगाडी नोंद संपर्क संजय पैलवान आवारवाडी मोबा.9273227758,तानाजी वलेकर उंबरमळे मोबा.7498750411,अनिल बुधवाले आवरवाडी,अनिल काटकर,संतोष देशमुख यांचेकडे नोंद करण्यात येईल,मैदानाला येण्यापूर्वी आयोजकांना फोन करून निघण्याची विनंती आयोजकांनी केली आहे