चिमुरात वृत्तपत्रे आणि पत्रकारांच्या न्याय मागण्यांसाठी धरणे आंदोलन-उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

95

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.11मे)::-व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांचे आदेशानुसार प्रदेश अध्यक्ष अनिल मस्के, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक यांचे मार्गद्शनाखाली जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, साप्ताहिकचे विभागाचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र जोगड, डिजिटल विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय सिद्धावार चिमूर येथे तालुका अध्यक्ष रामदास हेमके यांच्या नेतृत्वात वृत्तपत्रे आणि पत्रकारांच्या न्याय मागण्याबाबत तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करून उपविभागीय अधिकारी कार्यालय मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

माध्यमांकडे लोकशाहीचा चवथा स्तंभ म्हणून पहिले जाते. मात्र माध्यमकर्मींच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने शासनाकडून उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा, पत्रकारितेत ५ वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी, वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेला जीएसटी रद्द करावा.

पत्रकारांच्या घरांसाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा, कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे. शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात, साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात.

या मागण्यांच्या पुर्ततेसाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून उपविभागीय अधिकारी कार्यालय चिमूर मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.या वेळी व्हॉईस ऑफ मीडिया चिमूर तालुका अध्यक्ष रामदास हेमके, सचिव भरत बंडे. जिल्हा सदस्य प्रमोद राऊत, साप्ताहिक विभागाचे कार्याध्यक्ष सुरेश डांगे, साप्ताहिक विभाग जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश डांगे. डिजिटल विभाग जिल्हा सहचिटणीस श्रीहरी सातपुते,विलास कोराम,सुयोग डांगे, योगेश सहारे, फिरोज पठाण, सुनील हिंगनकर, जावेद पठाण, उमेश शंभरकर, विकास खोब्रागडे. इम्रान कुरेशी, योगेश अगडे. उपस्थित होते