सरपंच सेवा संघाच्या प्रशासक याचिकेला अनेकांचे सहकार्य

38

✒️संगमनेर/अहमदनगर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

संगमनेर/ अहमदनगर(दि.21जुलै):-संघर्ष प्रशासक पदाचा महाराष्ट्रातील मार्च मध्ये 1570 ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रोग्राम चालू होता,अर्जही भरले होते अचानक कोरोना आला व त्या निवडणूक स्थगित झाल्या व त्यावर एप्रिलमध्ये प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी नेमले गेले, यानतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री यांना पत्र देऊन प्रशासक म्हणून विद्यमान सरपंच, सदस्यांना मुदतवाढ मागितली होती मे मध्ये ग्रामविकासमंत्री महोदयांनी मुदतवाढ देण्यास असमर्थतता व्यक्त केली.त्यासंदर्भात बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, घटना दुरुस्ती मुळे मुदतवाढ शक्य नाही दर महिन्याला शेकडो ग्रामपंचायतीच्या मुदती संपत होत्या मी सातत्याने अनेक मंत्री महोदयांना बोलत होतो त्यातून कोरोना काळात उत्कृष्ट काम करत असल्याने विद्यमान सरपंच कुटुंबात पद देऊन ही लढाई सुरू ठेवण्याची कल्पना पुढे आली होती,अनेक मंत्र्यांना ती योग्य वाटली होती, निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीची संख्या जास्त व विस्तार अधिकारी कमी मुळे कायद्यात बदल करण्यासाठी राज्यपालांना प्रस्ताव पाठवल्याचे त्यांनी सांगितले25 जून ला राज्यपाल अध्यादेश आला त्यात योग्य व्यक्ती प्रशासक शासनाला नेमता येईल हे स्पष्ट झाले,योग्य व्यक्ती प्रशासक नको आमच्या निवडणूक घ्या म्हणून मुख्यमंत्री सह सर्व सम्बधीतांना पत्र दिले राज्यपाल अध्यादेश वर ग्रामविकास सचिव ने योग्य वक्ती प्रशासक नेमण्याचे निवेदन वजा परिपत्रकला आव्हान याचिका औरंगाबाद जिल्हाध्यक्ष संतोष वाघ यांच्या नेतृत्वाखाली दाखल करण्यात आली प्रशासक पदासाठी मोठ्या प्रमाणावर राजकीय कुरघोड्या ग्रामीण महाराष्ट्रात सुरू झाल्या आहेत यांतर आणखी काही याचिका दाखल तसेच नागपूर, मुंबई लाही दाखल झाल्या यानंतर घटना दुरुस्ती, शासनाचे अधिकार,आजपर्यंत च्या मुदतवाढ, सहकारी संस्था च्या मुदतवाढ हे न्यायालयातच ठरेल यासाठी सरपंच सेवा संघाचे प्रदीप हासे , बाळासाहेब मालुजकर, दिलीप भांगरे, बाबासाहेब उगले, उदय परब, सुनिल कन्नाके, विजय तडस, सुनिलआण्णा साळवी , बाळासाहेब नाझरकर ,समीर हावरे, जालिंदर फापाळे,बकंट बिजदार राजेश यमगवळी , विठ्ठल गिरी कैलास खैरनार, विजय जगताप,निसार शेख विश्वनाथ कोरे,यांच्यासह अनेकांचे सहकार्य असल्याने आपल्याला न्याय मिळवून देतील अशी खात्री आहे सरपंचांना न्याय मिळावा अशी अपेक्षा असल्याचे मत संस्थापक बाबासाहेब पावसे पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.